Breking News
हडपसरमध्ये दुचाकीच्या धडकेत ज्येष्ठाचा मृत्यूहवाई दलातील तोतया जवानाला पकडलेसराईत चौघे पुणे जिल्ह्यातून तडीपार; वाघोली पोलिसांची कारवाईनोंदणीकृत सेवादातांकडूनच कृत्रिम रेतन करा ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना–2026’परदेशी अभ्यास दौऱ्यात सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांनी अर्ज करण्याचे आवाहनचाकण एमआयडीसी परिसरातील सर्व रस्ते २५ ऑगस्टपर्यंत खड्डेमुक्त करा – जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे निर्देशखुनातील आरोपीला १२ कोयत्यांसह पकडलेसायबर फसवणूकीच्या रकमेसाठी बँक खात्याचा वापरपुण्यात दुचाकींच्या सायलेन्सरमध्ये फेरफार; २७४ दुचाकी चालकांविरुद्ध कारवाई

ठेवण्यासाठी दिलेल्या दागिन्यांचा केला अपहार, गुन्हा दाखल

नांदेडसिटी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा

marathinews24.com

पुणे – मित्राकडे ठेवण्यासाठी दिलेले ४ लाख ९ हजार रूपये किंमतीच्या दागन्यिांचा अपहार करण्यात आला आहे. संबंधित दागिने परत न देता त्यांची फसवणूक झाली आहे. ही घटना १० जून ते २९ जुलै २०२६ कालावधीत किरकिटवाडीत घडली आहे. याप्रकरणी नांदेडसिटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस असल्याची केली बतावणी, जेष्ठाला लुटले – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे मूळचे उत्तर प्रदेशातील असून, ते कामानिमित्त किरकिटवाडी परिसरात राहायला आहेत. जूनमध्ये त्यांनी ४ लाख ९ हजारांचे सोन्याचे दागिने मित्राकडे ठेवायला दिले होते. जुलैमध्ये त्यांनी संबंधिताला दागिन्यांची मागणी केली असता, त्याने चार लाखांचे दागिने माघारी देण्यास नकार देत फसवणूक केली आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक गणेश कसबे तपास करीत आहेत.

बँकखात्यातील ८ लाख रूपये केले गायब

बँकखात्यात असलेले तब्बल ८ लाख २८ हजार रूपये काढून तरूणाची फसवणूक करण्यात आली आहे. ही घटना १३ ते १५ जुलै २०२६ कालावधीत नर्‍हे परिसरात घडली आहे. याप्रकरणी गणेशनगरात राहणार्‍या नागरिकाने नर्‍हे पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार विविध बँकखातेधारकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे नर्‍हेतील गणेशनगरात राहायला असून, त्यांचे एका बँकेत बचत खाते आहे. १३ ते १५ जुलै कालावधीत त्यांच्या बँकखात्यातून तब्बल ८ लाख २८ हजार रूपये काढून विविध बॅकखात्यात वर्ग करण्यात आले. यासंदर्भात मेसेज किंवा ओटीपी त्यांना आला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर संबंधिताने नर्‍हे पोलीस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक देशमुख तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×