Breking News
Women Scientists Felicitation Pune : श्री महालक्ष्मी मंदिरातर्फे महिला शास्त्रज्ञांचा सन्मानMaharashtra Drought Relief Measures 2026 : बंद पाणीपुरवठा योजना तातडीने सुरू करा; टँकरचा पर्याय शेवटी वापरा–महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेAnubandh Support Group Pune : एकटेपणावर मात करण्यासाठी अनुबंधसारखे आधारगट हवे- विजया रहाटकरDagdusheth Ganpati Trust : ‘दगडूशेठ’ गणपती ट्र्स्ट तर्फे ५०० ज्येष्ठांना मोफत श्रवणयंत्रPolice Constable Suspension : इन्स्टाग्रामवरील बातमीवर आक्षेपार्ह टिप्पणी भोवलीPune Crime News : तडीपारीचा आदेश धुडकावून आरोपी महिला शहरात आल्याPune Mobile Theft Case : मोबाईल चोरणारा २४ तासांत जेरबंद; लक्ष्मीनगर पोलिसांची कारवाईMaharashtra Education News : दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क घेऊ नका; घेतले असल्यास परत कराPune Fertilizer License Suspended : रब्बी हंगामात खत विक्रीतील अनियमिततेप्रकरणी जिल्ह्यात चार वितरकांचे परवाने निलंबितDharau Marathi Movie 2026 : ‘धाराऊ… ती गाय नाय… माय हाय मायेच्या अतूट नात्याची भावस्पर्शी गोष्ट २३ ऑक्टोबरपासून चित्रपटगृहांत

रस्ता काँक्रिटीकरण करणार्‍या मजुरावर वार

Lohgaon Rickshaw Driver Attack : सीएनजी पंपावर वादातून रिक्षा चालकावर शस्त्राने वार

दोघे अटकेत

marathinews24.com

पुणे – रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम करणार्‍या मजुरावर तीक्ष्ण शस्त्राने वार केल्याची घटना ३१ जुलैला दुपारी एकच्या सुमारास हडपसरमधील फुरसुंगी भागात घडली. खुनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी दोघांना अटक केली असून, साथीदाराविरुद्ध फुरसुंगी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. प्रकाश राजेंद्र जाधव (वय ३३), नीलेश उद्धव गुरव (वय ३५, दोघे रा. माऊली कॉलनी, काळेपडळ, हडपसर) यांना अटक केली. त्यांच्याबरोबर असलेल्या दोन साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत मजुराने फुरसुंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

‘प्रगती’ उपक्रमाद्वारे सायबर गुन्ह्याना आडकाठी – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हडपसर-सासवड रस्त्यावर तुकाईदर्शन परिसरात रस्त्याचे काम सुरू आहे. शुक्रवारी (दि. ३१ ) दुपारी एकच्या सुमारास काँक्रिटीकरणाचे काम सुरू असल्याने रस्ता खोदला होता. त्यावेळी आरोपी जाधव, गुरव आणि साथीदार तेथे आले. रस्त्याचे काम करू नका, रस्ता खोदू नका, असे आरोपींनी त्यांना सांगितले. आरोपींनी काम थांबण्यास सांगितले. तक्रारदार मजूर आणि सहकार्‍यांना आरोपींनी शिवीगाळ केली. काम केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर तक्रारदार मजुराच्या डोक्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार करुन आरोपी पसार झाले. जखमी अवस्थेतील मजुराने घटनेची माहिती पोलिसांना कळविली. पोलिसांनी तपास करुन दोघा आरोपींना अटक केली. पोलीस उपनिरीक्षक संतोष मोरे तपास करत आहेत.

सिमेंटची पोती ठेवलेला ट्रक पळवून नेला

सिमेंटची पोती ठेवलेला ट्रक पळवून नेल्याची घटना हडपसर भागात घडली. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत एकाने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीने त्यांचा ट्रक हडपसरमधील डीपी रस्ता परिसरात लावून ठेवला होता. ट्रकमध्ये सिमेंटची पोती होती. पोती झाकून ठेवण्यात आली होती. डीपी रस्त्यावर लावलेला ट्रक मध्यरात्री पळवून नेला. ट्रक चोरीला गेल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. ट्रक चोरुन पसार झालेल्या चोरट्यांचा शोध घेण्यात येत असून, पोलिसांनी सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले आहे. सहायक पोलीस निरीक्षक विजय पाटील तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×