Breking News
Women Scientists Felicitation Pune : श्री महालक्ष्मी मंदिरातर्फे महिला शास्त्रज्ञांचा सन्मानMaharashtra Drought Relief Measures 2026 : बंद पाणीपुरवठा योजना तातडीने सुरू करा; टँकरचा पर्याय शेवटी वापरा–महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेAnubandh Support Group Pune : एकटेपणावर मात करण्यासाठी अनुबंधसारखे आधारगट हवे- विजया रहाटकरDagdusheth Ganpati Trust : ‘दगडूशेठ’ गणपती ट्र्स्ट तर्फे ५०० ज्येष्ठांना मोफत श्रवणयंत्रPolice Constable Suspension : इन्स्टाग्रामवरील बातमीवर आक्षेपार्ह टिप्पणी भोवलीPune Crime News : तडीपारीचा आदेश धुडकावून आरोपी महिला शहरात आल्याPune Mobile Theft Case : मोबाईल चोरणारा २४ तासांत जेरबंद; लक्ष्मीनगर पोलिसांची कारवाईMaharashtra Education News : दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क घेऊ नका; घेतले असल्यास परत कराPune Fertilizer License Suspended : रब्बी हंगामात खत विक्रीतील अनियमिततेप्रकरणी जिल्ह्यात चार वितरकांचे परवाने निलंबितDharau Marathi Movie 2026 : ‘धाराऊ… ती गाय नाय… माय हाय मायेच्या अतूट नात्याची भावस्पर्शी गोष्ट २३ ऑक्टोबरपासून चित्रपटगृहांत

भारती हाॅस्पिटलच्या आवारात भिंत कोसळली

भारती हाॅस्पिटलच्या आवारात भिंत कोसळली

४० ते ५० दुचाकींचे नुकसान; गंभीर दुर्घटना टळली

marathinews24.com

पुणे – शहरातील भारती हाॅस्पिटलच्या आवारातील वाहनतळाच्या परिसरात शनिवारी सकाळी भिंत कोसळली.राडारोड्याखाली ४० ते ५० वाहने सापडली. या घटनेत दुचाकींचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नाही.

गृहमंत्री अमित शहा यांच्या दौऱ्यादरम्यान ३०० कॉंग्रेस कार्यकर्ते ताब्यात – सविस्तर बातमी 

भारती हाॅस्पिटलच्या आवारात प्रशासकीय कार्यालयाच्या परिसरात मोठी भिंत आहे. साधारणपणे १०० फूट रूंद आणि २० फूट उंच ही भिंत आहे. दगड, विटांचा वापर करुन ही भिंत बांधण्यात आली आहे. शनिवारी सकाळी नऊच्या सुमारास भारती हाॅस्पिटलच्या आवारातील प्रशासकीय कार्यालयातील कर्मचारी भिंतीजवळ दुचाकी लावून कार्यालयात गेले. त्यानंतर दहाच्या सुमारास भिंत कोसळली. सुदैवाने या परिसरात कोणी थांबले नव्हते. अन्यथा गंभीर दुर्घटना घडली असती. भिंत कोसळल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे अधिकारी वसंत भिलारे, रामदास शिंदे, किरण पाटील, कुंभार, मयूर काटे, शिर्के, मुजावर यांच्यासह जवानांनी घटनास्थळी धाव घेतली.

जवानांनी घटनास्थळाची पाहणी केली. भिंतीखाली कोणी अडकले नसल्याची खात्री करण्यात आली. त्यानंतर जेसीबी यंत्राचा वापर करुन राडारोडा काढण्यास सुरुवात केली. राडारोड्याखाली अडकलेल्या दुचाकी काढण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. सायंकाळपर्यंत २० ते २२ दुचाकी बाहेर काढण्यात आल्या. भिंतीजवळ मोठी झाडे आहे. झाडांची मुळे भिंतीत शिरल्याने भिंत कमकुवत झाली असून, संततधार पावसामुळे भिंत कोसळली, अशी माहिती भिलारे यांनी दिली.

व्हिडीओ

error: Content is protected !!
Scroll to Top
×