‘७० टक्के नफ्याचे’ आमिष महागात; लिक्विड खरेदीच्या व्यवहारातून कंपनीची लाखोंची फसवणूक
marathinews24.com
पुणे – फ्रान्समधील कंपनीचा प्रतिनिधी असल्याचे भासवत वितरक नेमण्याच्या आमिषासह औद्योगिक लिक्विड खरेदीच्या बतावणीने कंपनीची ४७ लाख ८३ हजारांची फसवणूक झाली आहे ७ मे ते ७ जुलै २०२६ कालावधीत सिंहगड रोड परिसरात घटना घडली आहे. याप्रकरणी व्यावसायिकाने सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात आरोपींसह संबंधित बँक खातेदारांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
गावठी दारू विक्री करणारी महिला अटकेत – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे व्यावसायिक असून, परदेशी मोबाईल क्रमांकावरून व्हॉट्सअप मेसेज पाठवला. प्रâान्समधील डॉ. अँटोनिओ फिडेज कंपनीच्या पर्चेस मॅनेजर असल्याची बतावणी त्याने केली. हिंदुस्थानात ‘न्युप्रुगा एक्स सोल्युशन’ या लिक्विडची आवश्यकता असून, पूर्वीच्या पुरवठादाराचे निधन झाल्याने नवीन वितरकाच्या शोधात असल्याचे सांगितले. संबंधित व्यवहारातून होणार्या नफ्यातील ७० टक्के हिस्सा फिर्यादीच्या कंपनीला मिळेल, असे आमिष आरोपींनी दाखवले.
अशामा एंटरप्रायझेस या नावाने संपर्क साधून सुरुवातीला २५० एमएल आणि त्यानंतर ३० लिटर लिक्विड खरेदीसाठी ४७ लाख ८२ हजार ९६८ रुपये भरण्यास सांगण्यात आले. तसेच लुईस फिलिप नाव सांगणार्या व्यक्तीने तक्रारदाराच्या कार्यालयात भेट देऊन लिक्विडचे पैसे ब्लॉक कोटेड डॉलरमध्ये असल्याचे सांगितले. आणखी ४२ लाख रुपयांची मागणी केल्याने तक्रारदाराला संशय आला. त्यानंतर फसवणूक झाल्याचे लक्षात येत त्यांनी सायबर पोलिसांकडे धाव घेतली. याप्रकरणी विविध बँक खात्यांचा वापर करून रक्कम घेण्यात आली. पोलीस निरीक्षक राउत तपास करीत आहेत.
























