Breking News
हडपसरमध्ये दुचाकीच्या धडकेत ज्येष्ठाचा मृत्यूहवाई दलातील तोतया जवानाला पकडलेसराईत चौघे पुणे जिल्ह्यातून तडीपार; वाघोली पोलिसांची कारवाईनोंदणीकृत सेवादातांकडूनच कृत्रिम रेतन करा ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना–2026’परदेशी अभ्यास दौऱ्यात सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांनी अर्ज करण्याचे आवाहनचाकण एमआयडीसी परिसरातील सर्व रस्ते २५ ऑगस्टपर्यंत खड्डेमुक्त करा – जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे निर्देशखुनातील आरोपीला १२ कोयत्यांसह पकडलेसायबर फसवणूकीच्या रकमेसाठी बँक खात्याचा वापरपुण्यात दुचाकींच्या सायलेन्सरमध्ये फेरफार; २७४ दुचाकी चालकांविरुद्ध कारवाई

पुण्यातून तडीपार केलेल्या तीन गुंडाना पकडले

पिस्तूल बाळगणारा सराईत अटकेत

मंडईतील वाहनतळ, येरवडा, तसेच कात्रज परिसरात कारवाई

marathinews24.com

पुणे – शहर आणि जिल्ह्यातून तडीपार केल्यानंतर आदेशाचा भंग करणाऱ्या तीन गुंडांना पोलिसांनी पकडले. मंडईतील वाहनतळ, येरवडा, तसेच कात्रज परिसरात ही कारवाई करण्यात आली. महात्मा फुले मंडई परिसरातील एका गुंडाला पोलिसांनी पकडले. या प्रकरणी साहिल रफीक कलादगी (वय २४, रा. अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी ) याला अटक करण्यात आली. याबाबत सहायक पोलीस फौजदार अविनाश इंगळे यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीस हवालदार गोंजारी तपास करत आहेत.

फ्लॅटचे कुलूप तोडून साडेचार लाखांचा ऐवज चोरीला सविस्तर बातमी

दुसऱ्या कारवाईत आंबेगाव पोलिसांनी जांभुळवाडी तलाव परिसरात तडीपार गुंड तुषार कृष्णा कुचेकर (वय २१, रा. शनीनगर, कात्रज) याला ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध तडीपार आदेशाचा भंग केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस शिपाई शिवाजी आटोळे यांनी आंबेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीस हवालदार मोरे तपास करत आहे.

येरवडा भागातील तारकेश्वर मंदिराजवळ शहरातून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आलेला सराइत शशी पांडू चव्हाण (वय ४३, रा. सेवालाल चौक, येरवडा) याला ताब्यात घेण्यात आले. याबाबत पोलीस शिपाई राहुुल परदेशी यांनी लक्ष्मीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, हवालदार निलख तपास करत आहेत.
गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल करण्यात आलेल्या सराइतांना पुणे, पिंपरी-चिंचवड शहर, तसेच जिल्ह्यातून तडीपार करण्यात येते. या कालावधीत त्यांना शहरात येण्यास बंदी घालण्यात येते.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×