Breking News
हडपसरमध्ये दुचाकीच्या धडकेत ज्येष्ठाचा मृत्यूहवाई दलातील तोतया जवानाला पकडलेसराईत चौघे पुणे जिल्ह्यातून तडीपार; वाघोली पोलिसांची कारवाईनोंदणीकृत सेवादातांकडूनच कृत्रिम रेतन करा ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना–2026’परदेशी अभ्यास दौऱ्यात सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांनी अर्ज करण्याचे आवाहनचाकण एमआयडीसी परिसरातील सर्व रस्ते २५ ऑगस्टपर्यंत खड्डेमुक्त करा – जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे निर्देशखुनातील आरोपीला १२ कोयत्यांसह पकडलेसायबर फसवणूकीच्या रकमेसाठी बँक खात्याचा वापरपुण्यात दुचाकींच्या सायलेन्सरमध्ये फेरफार; २७४ दुचाकी चालकांविरुद्ध कारवाई

‘मॅगनेट’ प्रकल्पाबाबत अफवांवर स्पष्टीकरण; शेतकऱ्यांनी दिशाभूल करणाऱ्या संदेशांपासून सावध राहावे-प्रकल्प संचालक

मॅग्नेट प्रकल्पाच्या नावाचा गैरवापर करून फसवणूक करणाऱ्यांपासून सावध राहण्याचे प्रकल्प संचालकांचे आवाहन

marathinews24.com

पुणे – “प्रकल्पाच्या नावाखाली फसवणूक केल्याने अटक” अशा आशयाच्या बातम्या व सोशल मीडियावरील संदेशांमुळे गैरसमज निर्माण होत असल्याने महाराष्ट्र अॅग्रीबिझनेस नेटवर्क (मॅगनेट) प्रकल्पाने स्पष्टीकरण जारी केले आहे. या बातम्यांचा मॅग्नेट प्रकल्पाशी कोणताही संबंध नसून शेतकरी व जनतेने अशा भूलथापांना तोतयेगीरीला बळी पडू नये, असे आवाहन मॅग्नेट प्रकल्पाकडून करण्यात आलेले आहे.

माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचा डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनाबद्दल शोकसंदेश – सविस्तर बातमी

मॅगनेट प्रकल्पाचा उद्देश राज्यातील शेतकऱ्यांच्या शेतीमालाची काढणीनंतर होणारी नासाडी कमी करून त्यांच्या उत्पन्नात वाढ करणे हा आहे. या प्रकल्पामध्ये फळपिके आणि फुले यांचा समावेश असून, आशियाई विकास बँकेच्या आर्थिक सहकार्याने महाराष्ट्र शासनामार्फत त्याची अंमलबजावणी केली जात आहे.

प्रकल्पांतर्गत राज्यातील १४ प्रमुख फळपिके आणि विविध फुलपिकांसाठी एकात्मिक मूल्यसाखळी विकसित करण्यात येणार आहे. यामध्ये रोपवाटिका विकास, नवीन वाणांचा प्रसार, शेतकरी उत्पादक संस्थांचे सक्षमीकरण, आधुनिक शेती तंत्रज्ञान, काढणीनंतरचे व्यवस्थापन, प्रक्रिया उद्योग, बाजारपेठ विकास, तसेच सार्वजनिक पायाभूत सुविधा उभारणी यांचा समावेश आहे. प्रकल्पात समाविष्ट पिकांच्या मूल्यसाखळी विकासासाठी शेतकरी उत्पादक संस्था व गुंतवणूकदारांना अर्थसहाय्य उपलब्ध करून दिले जाणार असून, महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळामार्फत नवीन आणि विद्यमान सुविधांचा विकासही करण्यात येणार आहे.

मॅगनेट प्रकल्प प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, प्रकल्पामध्ये गुंतवणूक केल्यास व्याज अथवा परताव्याचे कोणतेही आश्वासन देण्यात आलेले नाही. त्यामुळे अशा प्रकारच्या फसव्या संदेशांवर विश्वास ठेवू नये तसेच प्रकल्पाच्या नावाचा गैरवापर करणाऱ्यांपासून सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी प्रकल्पाच्या अधिकृत https://magnetadb.com/ संकेतस्थळावरील माहितीचा आधार घ्यावा, असे आवाहन प्रकल्प संचालक (मॅग्नेट प्रकल्प) यांनी आले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×