Breking News
हडपसरमध्ये दुचाकीच्या धडकेत ज्येष्ठाचा मृत्यूहवाई दलातील तोतया जवानाला पकडलेसराईत चौघे पुणे जिल्ह्यातून तडीपार; वाघोली पोलिसांची कारवाईनोंदणीकृत सेवादातांकडूनच कृत्रिम रेतन करा ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना–2026’परदेशी अभ्यास दौऱ्यात सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांनी अर्ज करण्याचे आवाहनचाकण एमआयडीसी परिसरातील सर्व रस्ते २५ ऑगस्टपर्यंत खड्डेमुक्त करा – जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे निर्देशखुनातील आरोपीला १२ कोयत्यांसह पकडलेसायबर फसवणूकीच्या रकमेसाठी बँक खात्याचा वापरपुण्यात दुचाकींच्या सायलेन्सरमध्ये फेरफार; २७४ दुचाकी चालकांविरुद्ध कारवाई

पुणे स्टेशनच्या आवारात एकाचा खून

 सराइताचा गोळ्या झाडून सराइताचा खून

बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – शहरातील पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारात एका अनोळखी व्यक्तीवर तीक्ष्ण शस्त्राने वार करुन त्याचा खून करण्यात आल्याची घटना घडली. खून झालेल्या व्यक्तीची ओळख पटलेली नाही.

ज्येष्ठ महिलेचे अडीच लाखांचे दागिने हिसकावले – सविस्तर बातमी

याबाबत पोलीस उपनिरीक्षक गणेश चव्हाण यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, खुनाचा गु्न्हा दाखल करण्यात आला आहे.

पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारातील पार्किंगमध्ये लावलेल्या रिक्षात एक जण गंभीर जखमी अवस्थेत पडल्याची माहिती बंडगार्डन पोलिसांना ३ ऑगस्ट रोजी रात्री पावणेबाराच्या सुमारास मिळाली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. गंभीर जखमी अवस्थेतील व्यक्तीला तातडीने ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार करण्यात आले होते. उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले. खून झालेल्या व्यक्तीची ओळख पटलेली नाही.

पोलिसांकडून रेल्वे स्थानकाच्या आवारातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासण्यात येत आहे. खून झालेली व्यक्ती फिरस्ती असावी, असा संशय पोलिसांनी व्यक्त केली आहे. पोलीस उपनिरीक्षक गणेश वानखेडे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×