Breking News
हडपसरमध्ये दुचाकीच्या धडकेत ज्येष्ठाचा मृत्यूहवाई दलातील तोतया जवानाला पकडलेसराईत चौघे पुणे जिल्ह्यातून तडीपार; वाघोली पोलिसांची कारवाईनोंदणीकृत सेवादातांकडूनच कृत्रिम रेतन करा ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना–2026’परदेशी अभ्यास दौऱ्यात सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांनी अर्ज करण्याचे आवाहनचाकण एमआयडीसी परिसरातील सर्व रस्ते २५ ऑगस्टपर्यंत खड्डेमुक्त करा – जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे निर्देशखुनातील आरोपीला १२ कोयत्यांसह पकडलेसायबर फसवणूकीच्या रकमेसाठी बँक खात्याचा वापरपुण्यात दुचाकींच्या सायलेन्सरमध्ये फेरफार; २७४ दुचाकी चालकांविरुद्ध कारवाई

गांजा ओढणााऱ्या दोघांकडून तरुणाला मारहाण

‘जीममध्ये गाण्यावरुन वादातून मारहाणीची घटना

दोघांविरुद्ध खडक पोलिसांनी केला गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – रस्त्यावर गांजा ओढणाऱ्या दोघांना हटकल्याने तरुणाला मारहाण करण्यात आल्याची घटना भवानी पेठेतील काशेवाडी भागात घडली. या प्रकरणी दोघांविरुद्ध खडक पोलिसांनी गुन्हा दाखल केला. आकाश किसन कोळी (वय २७, रा. एकबोटे काॅलनी, घोरपडे पेठ) यांनी याबाबत खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार, ऋतिक मिसाळ, धर्मा लोंढे (रा. काशेवाडी, भवानी पेठ) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुणे स्टेशनच्या आवारात एकाचा खून – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हे सोनमर्ग चित्रपटगृहाजवळ असलेल्या एका गल्लीत मंगळवारी (४ जून) दुपारी दीडच्या सुमारास गांजा ओढत होते. त्या वेळी कोळी तेथून निघाले होते. ‘सार्वजनिक रस्त्यावर गांजा ओढू नका. महिलांना त्रास होतो’, असे कोळी यांनी आरोपींना सांगितले. या कारणावरुन आरोपींनी कोळी यांना शिवीगाळ केली. आरोपींनी कोळी यांच्या डोक्यात रस्त्यावर पडलेले कौल घातले. आरोपींनी केलेल्या मारहाणीत कोळी जखमी झाले. पसार झालेल्या आरोपींचा शोध घेण्यात येत असून, पोलीस हवालदार मोहन येलपले तपास करत आहेत.

मद्यपींकडून एकाला मारहाण

मद्यपींकडून एकाला मारहाण करण्यात आल्याची घटना हडपसरमधील फुरसुंगी परिसरात घडली. याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत विलास सुदाम गिरी (वय ५३, रा. चंदवाडी, फुरसुंगी, हडपसर) यांनी फुरसुंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी विशाल राजू शिंदे (वय ३५) याच्यासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गिरी हे सोमवारी मध्यरात्री कामावरुन दुचाकीवरुन घरी निघाले होते. चंदवाडीतील जुन्या कालव्याजवळ आरोपीनी त्यांना अडविले. आराेपी नशेत होते. आरोपींनी गिरी यांना शिवीगाळ केली. ‘आम्हाला ओळखत नाही का? ’, अशी विचारणा करुन आरोपींनी त्यांना मारहाण केली. पोलीस हवालदार खामगळ तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×