५ जणांवर गुन्हा, चार दुचाकी जप्त
marathinews24.com
पुणे – शहरातील विविध भागात मॉडीफाईड वाहनांचा वापर करीत नागरिकांना मनस्ताप देणार्या रायडरविरूद्ध पोलिसांनी मोहिम हाती घेत कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यानुसार विश्रांतवाडी पोलिसांनी बेशिस्त दुचाकीस्वारांसह ‘मध्यरात्री बुलेट सायलेन्सरमध्ये फटाक्यांसारखा आवाज वाजवून दहशत निर्माण करणार्याविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी ५ जणांविरूद्ध गुन्हा दाखल करीत त्यांच्याकडील चार अलिशान दुचाकी जप्त केल्या आहेत.
गांजा ओढणााऱ्या दोघांकडून तरुणाला मारहाण – सविस्तर बातमी
आशिष अशोक शिंदे (वय २१ रा लेन नं ९, निंबाळकरनगर, लोहगाव) गुरुपितसिंग कर्नलसिंग कंबोज (वय २१ रा. लेन नं. ९, निंबाळकरनगर, लोहगाव) संजय मुकेश सरवदे (वय २० रा. भिमनगर विश्रांतवाडी ) गौरव लक्ष्मण मस्के (वय २० रा.मस्केवस्ती, विश्रांतवाडी) यांच्यासह एका अल्पवयीनाविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्यातील ५ लाख ७५ हजारांच्या चार दुचाकी जप्त केल्या आहेत.
धानोरीतील रिगालीया सोसायटीजवळ ३१ जुलैला मध्यरात्री दोनच्या सुमारास रस्त्यावर काही तरुणांनी बुलेट गाडयांसह दुचाकींच्या सायलेंन्सरचा फटाक्या सारख्या कर्णकर्कश आवाज काढत होते. धोकादायक पध्दतीने गाडया चालविलेच्या रिल्स सोशल मिडीयावर व्हायरल होत होत्या. त्यामुळे परिसरातील नागरीकांनी रात्री परिसरात भितीदायक वातावरण निर्माण झाले होते. याप्रकरणी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात तक्रारी प्राप्त झाल्या. याप्रकरणी तपास पथकाने माहिती घेउन दोन बुलटे, एक केटीएमसह स्प्लेंडर अशी वाहने जप्त केली.
संबंधित वाहन चालकांविरूद्ध गुन्हा दाखल केला. तसेच दुचाकींचे सायलेंन्सर बाजूला काढण्यात आले आहेत. याप्रकरणी बेशिस्त रायडरांच्या कुटूंबियाला माहिती देण्यात आली आहे. तसेच यापुढे अशाप्रकाराची बेफिकरी करणार नसल्याची हमी रायडरांनी दिली आहे. ही कामगिरी अपर आयुक्त मनोज पाटील, उपायुक्त चिलूमुला रजनिकांत, एसीपी सुनिल जैतापुरकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे, पोलीस निरीक्षक संपतराव राऊत, पोलीस निरीक्षक अमर कदम, एपीआय सुनिल उगले, बबन वणवे, कृष्णा माचरे, यशवंत किर्वे, संपत भोसले, विशाल गाडे, वामन सावंत, संजय बादरे, धवल लोणकर, स्वप्नील कांबळे, किशोर भुसारे, होना साबळे, प्रमोद जाधव यांनी केली.
























