Breking News
नोंदणीकृत सेवादातांकडूनच कृत्रिम रेतन करा ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना–2026’परदेशी अभ्यास दौऱ्यात सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांनी अर्ज करण्याचे आवाहनचाकण एमआयडीसी परिसरातील सर्व रस्ते २५ ऑगस्टपर्यंत खड्डेमुक्त करा – जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे निर्देशखुनातील आरोपीला १२ कोयत्यांसह पकडलेसायबर फसवणूकीच्या रकमेसाठी बँक खात्याचा वापरपुण्यात दुचाकींच्या सायलेन्सरमध्ये फेरफार; २७४ दुचाकी चालकांविरुद्ध कारवाई९३ लाखांची फसवणूक प्रकरणात पसार आरोपींना पकडलेयेरवडा जेलबाहेर फटाके उडवून आरोपीचे उदात्तीकरणफरार आरोपीसह दोघांना अटक; ३ पिस्टल जप्त

परदेशी अभ्यास दौऱ्यात सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे यांचे आवाहन

marathinews24.com

पुणे – विविध देशांनी विकसित केलेले शेतीविषयक तंत्रज्ञान व तेथील शेतकऱ्यांनी त्याचा केलेला अवलंब व त्याद्वारे त्यांच्या उत्पन्नात झालेली वाढ याबाबत शेतकऱ्यांचे ज्ञान आणि क्षमता उंचावण्याकरिता राज्यातील शेतकऱ्यांसाठी युरोप व चीन अभ्यासदौरा आयोजित करण्यात येणार असून जिल्ह्यातील इच्छुक शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी २२ ऑगस्ट २०२६ पर्यंत तालुका कृषी अधिकारी कार्यालयात अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे यांनी केले आहे.

चाकण एमआयडीसी परिसरातील सर्व रस्ते २५ ऑगस्टपर्यंत खड्डेमुक्त करा – सविस्तर बातमी

जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या उत्पादीत होणाऱ्या शेतीमालाची दर्जात्मक सुधारणा करण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर शेतकऱ्यांनी करणे गरजेचे आहे. शेतीशी निगडीत घटकांबाबत जगात वेळोवेळी होत असलेले बदल, विकसित होत असलेले तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत त्यांच्या गरजेनुरुप योग्यवेळी पोहोचविणे आणि त्यासाठी आवश्यक सहाय्य व सोयीसुविधा पुरविणे निकडीचे आहे. कृषि विस्तार कार्यक्रमाद्वारे शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती देण्याकरीता करावयाच्या विविध उपाययोजनांसाठी कृषि विभागाकडून त्यादृष्टीने प्रयत्न करण्यात येत आहेत. या उद्दिष्टाने हे दौरे आयोजित करण्यात येणार असून युरोप दौऱ्यात फलोत्पादन, सेंद्रिय शेती आणि दुग्धोत्पादन तर चीन दौऱ्यात विविध कृषि तंत्रज्ञान, पीक उत्पादकता वाढवण्यासाठी लागणारे तंत्रज्ञान आणि कृषि एक्सो इत्यादी विषयांवर माहिती मिळणार आहे.

शासनाकडून अभ्यास दौत्याकरीता सर्व शेतकऱ्यांना एकूण खर्चाच्या ५० टक्के रक्कम किंवा जास्तीत जास्त रुपये २ लाख प्रती लाभार्थी यापैकी कमी असेल ती रक्कम अनुदान म्हणून देय असेल. शेतकऱ्याने त्याचे बँक खाते आधार क्रमांकाशी जोडून घेणे आवश्यक. निवड झालेल्या शेतकऱ्यांना दौऱ्यांची तारीख निश्चित झाल्यानंतर दौऱ्यामध्ये निवड झाल्याचे कृषी विभागाकडून पत्र मिळाल्यानंतरच अभ्यास दौऱ्याच्या एकूण खर्चाच्या ५० टक्के किंवा रुपये २ लाख यापैकी जी रक्कम कमी असेल ती वगळून उर्वरित रक्कम प्रवासी कंपनीकडे आगाऊ भरणा करणे बंधनकारक राहील.

शेतकरी अभ्यास दौऱ्याकरीता निवडीचे निकष

लाभार्थी हा स्वतः शेतकरी असावा, स्वतःच्या नावे चालू कालावधीचा ७/१२ व ८-अ उत्तारा, उत्पन्नाचे मुख्य साधन शेती असल्याचे स्वयंघोषणापत्र (प्रपत्र २), शेतकऱ्याचे अॅग्रीस्टॅक अंतर्गत फार्मर आय डी असणे आवश्यक आहे. शेतकरी कुटुंबामधून फक्त एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ घेता येईल. आधार प्रमाणपत्राची प्रत आवश्यक राहील. शेतकऱ्याचे वय २५ वर्षे पूर्ण असावे. शेतकरी वैध पारपत्रधारक (पासपोर्ट) असावा. शेतकरी शासकीय, निमशासकीय, सहकारी, खाजगी संस्थेत नोकरीत नसावा. तसेच वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर, वकील, सीए, अभियंता, कंत्राटदार नसल्याबाबत स्वयंघोषणापत्र (प्रपत्र २), शेतकऱ्याने यापूर्वी शासकीय अर्थसहाय्याने विदेश दौरा केला नसल्याबाबत स्वयंघोषणापत्र (प्रपत्र २), शेतकऱ्याने परदेश दौऱ्यासाठी अर्ज सादर करताना शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त असल्याबाबतचे वैद्यकीय प्रमाणपत्र (किमान एम.बी.बी.एस. डॉक्टरचे) सादर करणे आवश्यक राहील, असेही काचोळे यांनी कळविले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×