Breking News
Women Scientists Felicitation Pune : श्री महालक्ष्मी मंदिरातर्फे महिला शास्त्रज्ञांचा सन्मानMaharashtra Drought Relief Measures 2026 : बंद पाणीपुरवठा योजना तातडीने सुरू करा; टँकरचा पर्याय शेवटी वापरा–महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेAnubandh Support Group Pune : एकटेपणावर मात करण्यासाठी अनुबंधसारखे आधारगट हवे- विजया रहाटकरDagdusheth Ganpati Trust : ‘दगडूशेठ’ गणपती ट्र्स्ट तर्फे ५०० ज्येष्ठांना मोफत श्रवणयंत्रPolice Constable Suspension : इन्स्टाग्रामवरील बातमीवर आक्षेपार्ह टिप्पणी भोवलीPune Crime News : तडीपारीचा आदेश धुडकावून आरोपी महिला शहरात आल्याPune Mobile Theft Case : मोबाईल चोरणारा २४ तासांत जेरबंद; लक्ष्मीनगर पोलिसांची कारवाईMaharashtra Education News : दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क घेऊ नका; घेतले असल्यास परत कराPune Fertilizer License Suspended : रब्बी हंगामात खत विक्रीतील अनियमिततेप्रकरणी जिल्ह्यात चार वितरकांचे परवाने निलंबितDharau Marathi Movie 2026 : ‘धाराऊ… ती गाय नाय… माय हाय मायेच्या अतूट नात्याची भावस्पर्शी गोष्ट २३ ऑक्टोबरपासून चित्रपटगृहांत

सराईत चौघे पुणे जिल्ह्यातून तडीपार; वाघोली पोलिसांची कारवाई

वाघोली-लोणीकंद परिसरात दहशत माजवणाऱ्या चार गुन्हेगारांवर कारवाई

marathinews24.com

पुणे – शहरातील वाघोली आणि लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीत वारंवार गंभीर स्वरूपाचे गुन्हे करणाऱ्या चार सराईत गुन्हेगारांना तडीपार करण्यात आले आहे. परिमंडळ सातचे पोलीस उपायुक्त अबिनाश कुमार यांनी महाराष्ट्र पोलिस अधिनियमाच्या कलम ५६(१)(अ) अन्वये आदेश काढत दोघांना दोन वर्षांसाठी, तर अन्य दोघांना एक वर्षासाठी संपूर्ण पुणे जिल्ह्यातून तडीपार केले आहे.

खुनातील आरोपीला १२ कोयत्यांसह पकडले – सविस्तर बातमी

तडीपार करण्यात आलेल्या आरोपींमध्ये तानाजी अर्जुन जाधव (वय २६, रा. लाडबा वस्ती, केसनंद), ओम दादाराव म्हस्के (वय १९, रा. दुबेनगर, वाघोली), आकाश बाळू वायकर (वय २९, रा. खानवेनगर, लोहगाव) आणि माखन भारत निसार (वय २९, रा. भावडी रोड, वाघोली) यांचा समावेश आहे. तानाजी जाधव व ओम म्हस्के यांना प्रत्येकी दोन वर्षांसाठी, तर आकाश वायकर व माखन निसार यांना प्रत्येकी एक वर्षासाठी तडीपार करण्यात आले आहे.

तानाजी जाधव याच्यावर जबरी चोरी, दुखापत, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे, संघटित गुन्हेगारी आणि नागरिकांमध्ये दहशत निर्माण करण्याचे गुन्हे दाखल आहेत. ओम म्हस्के याच्यावर प्राणघातक हल्ला, शस्त्राचा धाक दाखवत दहशत माजवणे, सार्वजनिक शांतता भंग करणे, धमकी देणे व मारहाणीचे गुन्हे आहेत. आकाश वायकर याच्यावर मारहाण, तोडफोड व दहशत निर्माण करण्याचे, तर माखन निसार याच्यावर बेकायदेशीर गावठी हातभट्टी दारू विक्रीसह विविध गंभीर गुन्हे दाखल आहेत.

आरोपींच्या सातत्याने सुरू असलेल्या गुन्हेगारी कारवायांमुळे कायदा व सुव्यवस्था धोक्यात येत असल्याने त्यांच्याविरुद्ध तडीपारीचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. त्यानुसार हा आदेश जारी करण्यात आला. ही कारवाई अपर पोलिस आयुक्त मनोज पाटील, पोलिस उपायुक्त अबिनाश कुमार, एसीपी अनिता मोरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड,पोलीस निरीक्षक पल्लवी मेहेर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक विजय चंदन, उपनिरीक्षक शिवशंकर राघू, सहाय्यक फौजदार बाळासाहेब मोराळे तसेच पोलिस अंमलदार प्रदीप मोटे, सचिन कुटे, सागर कडू, कमलेश शिंदे, राकेश गायकवाड, अशोक शेळके, पांडुरंग माने, समीर भोरडे, राहुल गोरे, योगेश शिंदे, अमोल घावटे, ऋषीकेश व्यवहारे, अमोल सरतापे, महादेव कुंभार, मारुती वाघमारे, शेखर शिंदे, ज्योती काळे यांनी केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×