चोरट्याविरुद्ध फरासखााना पोलिसांनी केला गुन्हा दाखल
marathinews24.com
पुणे – खरेदीसाठी आलेल्या महिलेच्या पिशवीतून १ लाख ४० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरुन नेण्यात आल्याची घटना रविवार पेठेतील कापडगंज परिसरात घडली. याप्रकरणी चोरट्याविरुद्ध फरासखााना पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत एका महिलेने फिर्याद दिली आहे.
बारामतीत पुन्हा विमान अपघात, सुदैवाने कोणीही जखमी नाही – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ५० वर्षीय महिला सासवड रस्त्यावरील ऊरळी देवाची परिसरात राहायला आहेत. त्या शनिवारी (८ ऑगस्ट) सायंकाळी पाचच्या सुमारास रविवार पेठेतील कापडगंज परिसरात खरेदीसाठी आल्या होत्या. रामसुख मार्केटजवळ गर्दीत चोरट्याने त्यांच्या पिशवीतून एक लाख ४० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लांबविले. दागिने चोरीला गेल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली. सहायक पोलीस निरीक्षक भाग्यश्री मोढळे तपास करत आहेत.
मोटारीची काच फोडून लॅपटाॅप चोरीला
मोटारीची काच फोडून चोरट्यांनी दोन लॅपटाॅप चोरुन नेल्याची घटना शिवाजीनगर गावठाण भागात घडली. या प्रकरणी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत एका तरुणाने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुणाने शिवाजीनगर गावठाण परिसरातील सुदामा हाॅटेलजवळील गल्लीत मोटार लावली होती. शनिवारी सायंकाळी सातच्या सुमारास मोटारीची काच फोडून ५० हजारांचे दोन लॅपटाॅप चोरट्यांनी चोरुन नेले. पोलीस उपनिरीक्षक प्रमोद शिंदे तपास करत आहेत.























