फेसलेस लर्नींग लायसन्ससाठी परीक्षा देताना सूचनांचे काटेकोर पालन करा

प्रादेशिक परिवहन अधिकारी यांचे आवाहन

marathinews.com

पुणे – फेसलेस लर्निंग लायसन्स प्रक्रियेमध्ये एआय आधारित प्रणाली आधार कार्डची ओळख प्रक्रिया तपासते. अर्ज करताना चेहरा स्पष्ट दिसणे आवश्यक असून नागरिकांनी लर्निंग लायसन्सची ऑनलाईन परीक्षा शांत, पुरेशा प्रकाशात आणि कोणत्याही व्यत्ययाशिवाय पूर्ण करावी. परीक्षा सुरू असताना इतर व्यक्तींची उपस्थिती, अनावश्यक हालचाल किंवा आवाज टाळावा. फेसलेस लर्निंग लायसन्ससाठी अर्ज करताना आवश्यक सूचनांचे काटेकोरपणे करावे, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी केले आहे.

खडकवासला धरणाची साठवण क्षमता पुनर्संचयित करा – सविस्तर बातमी

लर्निंग लायसन्स प्रक्रियेमध्ये आधारावरील छायाचित्राशी चेहरा हा डोळ्यांची हालचाल (Blink Detection) योग्यरीत्या होणे, आजूबाजूला इतर कोणतीही व्यक्ती नसणे, कोणताही आवाज किंवा हालचाल नसणे तसेच इतर व्यक्तांकडून मदत घेतली जात नसल्याची खात्री होणे आवश्यक आहे. सारथी प्रणालीद्वारे आधार-आधारित फेसलेस पद्धतीने लर्निंग लायसन्ससाठी अर्ज करणाऱ्या अनेक अर्जदाराचे अर्ज कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित पडताळणी प्रक्रियेदरम्यान नियमांचे पालन होत नसल्याने लर्निंग लायसन्स मंजूर होऊ शकत नसल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणावर प्राप्त होत आहेत. परिणामी अनेक नागरिकांचे भरलेले शुल्क वाया जात असल्याच निदर्शनास आले आहे.

नागरिकांनी फेसलेस लर्निंग लायसन्स अर्जांची पडताळणी व निर्णय प्रक्रिया ही पूर्णपणे केंद्रीय एआय आधारित प्रणालीमार्फत केली जाते. त्यामुळे अशा प्रकरणांमध्ये प्रादेशिक परिवहन कार्यालय स्तरावर कोणताही हस्तक्षेप किंवा निर्णय घेणे शक्य नाही, असेही परिवहन कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×