Breking News
Pune Crime : पुण्यातील लक्ष्मी रस्ता, विमाननगरला लुटीची घटनाKharadi News : ड्रग्जच्या खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी; तरुणाची आत्महत्याPune Crime News : पुण्यात वेगवेगळ्या भागात दोघांना लुटलेतडीपार केलेल्या तीन महिला ताब्यात; तडीपार आदेशाचा भंग केल्याचे उघडWomen Scientists Felicitation Pune : श्री महालक्ष्मी मंदिरातर्फे महिला शास्त्रज्ञांचा सन्मानMaharashtra Drought Relief Measures 2026 : बंद पाणीपुरवठा योजना तातडीने सुरू करा; टँकरचा पर्याय शेवटी वापरा–महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेAnubandh Support Group Pune : एकटेपणावर मात करण्यासाठी अनुबंधसारखे आधारगट हवे- विजया रहाटकरDagdusheth Ganpati Trust : ‘दगडूशेठ’ गणपती ट्र्स्ट तर्फे ५०० ज्येष्ठांना मोफत श्रवणयंत्रPolice Constable Suspension : इन्स्टाग्रामवरील बातमीवर आक्षेपार्ह टिप्पणी भोवलीPune Crime News : तडीपारीचा आदेश धुडकावून आरोपी महिला शहरात आल्या

रुग्णवाहिकांचे सुधारित भाडेदर निश्चित- अर्चना गायकवाड

पुणे, पिंपरी-चिंचवड व बारामतीसाठी रुग्णवाहिकांचे नवीन दर लागू; जादा भाडे आकारल्यास २० हजारांपर्यंत दंड

marathinews24.com

पुणे – प्रादेशिक प्राधिकरण, पुणे, पिंपरी- चिंचवड व बारामती कार्यक्षेत्रामधील रुग्णवाहिकांचे सुधारित भाडेदर लागू करण्यात आले असून हे भाडेदर रुग्णवाहिकेत रुग्ण बसल्यापासून परतीच्या अंतरासाठी लागू राहतील, रुग्णवाहिकांकरिता निश्चित केलेल्या दरपत्रकाची काटेकोरपणे अंमलबजावणी न करणाऱ्या वाहन चालक, मालक यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड यांनी कळविले आहे.

फेसलेस लर्नींग लायसन्ससाठी परीक्षा देताना सूचनांचे काटेकोर पालन करा- प्रादेशिक परिवहन अधिकारी – सविस्तर बातमी

सुधारित दरपत्रकानुसार अवातानुकुलीत मारुती व्हॅन साठी 25 कि.मी. अथवा दोन तासासाठी 700 रुपये, त्यापुढील प्रती किलोमीटर साठी 16 रुपये, प्रति प्रतिक्षा तास 125 रुपये, प्रतिदिन किंवा 300 कि.मी. साठी 4 हजार रुपये, इंधन, देखभाल व दुरुस्ती व चालकांशिवाय 1 हजार रुपये प्रतिदिन दर राहतील.

अवातानुकुलीत मारुती ईको, टाटा मॅजिक यासाठी 25 कि.मी. अथवा दोन तासासाठी 900 रुपये, त्यापुढील प्रती किलोमीटर साठी 17 रुपये, प्रति प्रतिक्षा तास 125 रुपये, प्रतिदिन किंवा 300 कि.मी. साठी 4 हजार 500 रुपये, इंधन, देखभाल व दुरुस्ती व चालकांशिवाय 1 हजार 200 रुपये प्रतिदिन दर राहतील.

अवातानुकुलीत महिंद्रा बोलेरो, फोर्स क्रुझरसाठी 25 कि.मी. अथवा दोन तासासाठी 1 हजार 200 रुपये, त्यापुढील प्रती किलोमीटर साठी 18 रुपये, प्रति प्रतिक्षा तास 150 रुपये, प्रतिदिन किंवा 300 कि.मी. साठी 5 हजार रुपये, इंधन, देखभाल व दुरुस्ती व चालकांशिवाय 1 हजार 500 रुपये प्रतिदिन दर राहतील.

अवातानुकुलीत फोर्स टेम्पो ट्रॅव्हलरसाठी 25 कि.मी. अथवा दोन तासासाठी 1 हजार 500 रुपये, त्यापुढील प्रती किलोमीटर साठी 22 रुपये, प्रति प्रतिक्षा तास 175 रुपये, प्रतिदिन किंवा 300 कि.मी. साठी 7 हजार रुपये, इंधन, देखभाल व दुरुस्ती व चालकांशिवाय 2 हजार रुपये प्रतिदिन दर राहतील.

वातानुकुलीत फोर्स टेम्पो ट्रॅव्हलरसाठी (आयसीयु) 25 कि.मी. अथवा दोन तासासाठी 2 हजार 500 रुपये, त्यापुढील प्रती किलोमीटर साठी 30 रुपये, प्रति प्रतिक्षा तास 250 रुपये, प्रतिदिन किंवा 300 कि.मी. साठी 10 हजार रुपये, इंधन, देखभाल व दुरुस्ती व चालकांशिवाय 4 हजार रुपये प्रतिदिन दर राहतील.

निश्चित केलेल्या भाडेदरापेक्षा जास्त भाडेदर आकारणी करणाऱ्या वाहनमालक, चालकांवर दंडात्मक कारवाई म्हणून पहिल्या गुन्ह्याकरिता 5 हजार रुपये दुसऱ्या गुन्ह्याकरिता 10 हजार रुपये व तिसऱ्या व त्यापुढील प्रत्येक गुन्ह्याकरिता 20 हजार रुपये याप्रमाणे दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असेही श्रीमती गायकवाड यांनी कळविले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×