Breking News
Pune Woman Police Assault : पुण्यात विसर्जन घाटावर महिला पोलिसाला नारळ फेकून मारला, दातच पाडलाShivraj More Voter List : मतदार याद्यांतील गोंधळाची चौकशी करा; ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा घ्याChakan Hinjewadi Infrastructure Plan : चाकण-हिंजवडीतील वाहतूक व नागरी सुविधांसाठी एकात्मिक पायाभूत विकास आराखड्यास तत्वतः मंजुरी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसNeelam Gorhe Residence Case : डॉ. नीलम गोर्‍हे यांच्या निवासस्थानात शिरण्याचा प्रयत्नDog Attack : कुत्र्याने घेतला १२ वर्षीय मुलाच्या चेहर्‍याचा चावाSugarcane Crushing Season 2026 : ऊस गाळप हंगाम १५ ऑक्टोबरपासून; परवाना प्राप्त कारखान्यांना त्यापूर्वीही गाळपाची मुभाSeva Sankalp Abhiyan Indapur : इंदापूर तालुक्यात ‘सेवा संकल्प अभियान’ उत्साहातPimpri Chinchwad Election Restrictions : विधानपरिषद शिक्षक व पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवडमध्ये निर्बंध लागूपद्मश्री डॉ. कोल्हे दाम्पत्याकडून दुधभाते नेत्रालयाच्या आधुनिक नेत्रसेवेचे कौतुकPune Crime News : काळेपडळमध्ये गांजा विक्रेत्या सराईत टोळीचा पर्दाफाश

गुंतवणुकीच्या आमिषाने ज्येष्ठाची ९६ लाखांची फसवणूक

शेअर्समधील गुंतवणूक पडली महागात

चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने ज्येष्ठ नागरिकाची सायबर चोरट्यांनी ९६ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत एका ज्येष्ठ नागरिकाने शिवाजीनगर येथील सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

मतदार नोंदणी यादी दुरुस्ती अर्जात दुरस्तीची बतावणी – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ७८ वर्षीय ज्येष्ठ नागरिक हे कोथररूडमधील भुसारी काॅलनीत राहायला आहेत. सायबर चोरट्यांनी त्यांच्या मोबाइल क्रमांकावर २८ जून रोजी संदेश पाठविला होता. शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष चोरट्यांनी त्यांना दाखविले होते. चोरट्यांनी त्यांना शेअर बाजारात गुंतवणूक योजनेबाबतची माहिती देण्यासाठी एक ॲप मोबाइलमध्ये घेण्यास सांगितले. ज्येष्ठ नागरिकाने सुरुवातीला काही रक्कम भरली.

चोरट्यांनी त्यांना परतावा मिळाल्याचे भासविले. प्रत्यक्षात त्यांना परतावा दिला नाही. ज्येष्ठ नागरिकाने सायबर चोरट्यांच्या बँक खात्यात गेल्या दोन महिन्यात वेळोवेळी ९६ लाख ५० हजार रुपये जमा केले. परताव्याबाबत त्यांनी विचारणा करण्यासाठी त्यांनी चोरट्यांच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. फसवणूक झाल्याचे उघडकीस आल्यनंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस निरीक्षक शरद शेळके तपास करत आहेत.

पुणे स्टेशन परिसरात ट्रकच्या धडकेत तरुण ठार

ट्रकच्या धडकेत पादचारी तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना पुणे स्टेशन परिसरात घडली. याप्रकरणी ट्रक चालकाविरुद्ध बंडगार्डन पोलिसांनी गुन्हा दाखल केला. अपघातात मृत्युमुखी पडलेल्या पादचारी तरुणाची ओळख पटलेली नाही. त्याचे वय अंदाजे ३५ वर्ष असून, तो फिरस्ता असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली. याबाबत शंकर परशुराम शेटके (वय ५२, रा. ताडीवाला रस्ता, पुणे स्टेशनजवळ) यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्याथ फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १० ऑगस्ट रोजी रात्री दहाच्या सुमारास पादचारी तरुण पुणे स्टेशनच्या आवारातून निघाला होता. त्यावेळी स्टेशनच्या आवारातील वाहन तळाच्या परिसरातून ट्रक निघाला होता. ट्रकने पादचारी तरुणाला धडक दिली. अपघातात तरुण गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे ससून रुग्णालयातील वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले. पोलीस उपनिरीक्षक रेश्मा मोरे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×