Breking News
Fake Job Scam : बनावट भरती घोटाळ्यात जेजुरी देवस्थानचा विश्वस्त अटकेतAnjali Malkar Award : हा तर संगीत कलेचा साहित्य दरबारात सन्मान-अंजली मालकरPune Missing Minor Death : पुण्यातील बेपत्ता अल्पवयीन मुलाचा मृतदेह आढळलाNilesh Ghaywal MCOCA Acquittal : कुख्यात गुंड निलेश घायवळसह टोळी निर्दोषPune MLC Election 2026 : महाराष्ट्र विधान परिषदेच्या पुणे विभाग पदवीधर आणि पुणे विभाग शिक्षक मतदार संघाची निवडणूकForeign Language Training Pune : पुणे जिल्हा परिषद-  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा परकीय भाषा शिक्षण उपक्रम पाच भाषांपर्यंत विस्तारलाSuicide Case : प्रेमात फसवणूक झाल्याने विवाहित महिलेची आत्महत्याAccident News : वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील सहप्रवाशाच्या मृत्यूWorld Rabies Day : सेवा संकल्प अभियानांतर्गत जागतिक रेबीज दिन उत्साहातभटक्या-विमुक्त नागरिकांसाठी विशेष हक्क व प्रमाणपत्र अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद

Ganesh Visarjan Sound Reading : विसर्जन मिरवणुकीत १ हजार २२४ मंडळांचे ध्वनी रीडिंग, कारवाईला सुरूवात

विसर्जन मिरवणुकीत १ हजार २२४ मंडळांचे ध्वनी रीडिंग, कारवाईला सुरूवात

पुणे पोलिसांकडून संबंधितांना ‘कारणे दाखवा’ नोटीस

marathinews24.com

पुणे – Ganesh Visarjan Sound Reading : शहरात गणेश विसर्जन मिरवणुकीत ध्वनिक्षेपकांच्या आवाजाची मर्यादा ओलांडणाऱ्या बेशिस्त मंडळाविरुद्ध पोलिसांनी कारवाईच्या दृष्टीने आकडेवारी संकलित केली आहे. त्यानुसार आता ध्वनी पातळी न पाळणाऱ्या संबंधित मंडळाविरुद्ध खटले, गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. पुणे पोलिसांनी ‘चार बेस, चार टॉप’चा फॉर्म्युला लागू केला होता. मात्र, प्रत्यक्ष मिरवणुकीत अनेक ठिकाणी आवाजाची मर्यादा ओलांडली आहे.

पुण्यात विसर्जन घाटावर महिला पोलिसाला नारळ फेकून मारला, दातच पाडला – सविस्तर बातमी 

पोलिसांनी विसर्जन मिरवणुकीदरम्यान दोन दिवसात ( दि २५ व २६ ) १ हजार २२४ गणेश मंडळांचे ध्वनिक्षेपकांचे रीडिंग घेतले असून, आता मंडळांवर कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. (Ganesh Visarjan Sound Reading) गणेशोत्सवापूर्वीच ध्वनि प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी मंडळांना चार बेस आणि चार टॉप स्पीकरची मर्यादा घालून दिली होती. त्याबरोबर आवाजाची पातळीही निर्धारित मर्यादेत ठेवण्याच्या सूचना दिल्या होत्या. या सोबतच प्रेशर मीड तसेच प्लाझमाला पुर्णत: बंदी असेल असे नमूद केले होते. मात्र, विसर्जन मिरवणुकीत ढोल-ताशा, डीजे आणि ध्वनिक्षेपकांचा मोठा आवाज अनेक ठिकाणी ऐकायला मिळाला.

यापार्श्वभूमीवर पोलिसांनी आवाजाच्या घेतलेल्या रीडिंगच्या आधारे आता मंडळांवर कारवाई केली जाणार आहे. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी परिमंडळाच्या पोलिस उपायुक्तांना कारवाईचे अधिकार दिले आहेत. ध्वनी प्रदूषण करणाऱ्या संबंधित मंडळांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यास सुरुवात केली आहे. रीडिंगमध्ये निर्धारित निकषांचे उल्लंघन झाल्याचे आढळल्यास संबंधित मंडळाकडून त्याबाबत स्पष्टीकरण मागविण्यात येणार आहे. मंडळाचे म्हणणे आल्यानंतर पुढील कारवाईचा निर्णय घेतला जाणार आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×