घोडेगावच्या आदिवासी मुलींच्या शासकीय वसतिगृहातील विद्यार्थिनींचा उत्स्फूर्त सहभाग
marathinews24.com
पुणे – आंबेगाव तालुक्यातील आदिवासी मुलींचे शासकीय वसतिगृह, घोडेगाव येथे ‘सेवा संकल्प अभियान २०२६’ अंतर्गत भित्तीपत्रक व पोस्टर निर्मिती स्पर्धेच्या माध्यमातून सेवा, सर्जनशीलता आणि सामाजिक जाणीव यांचा सुंदर संगम घडविणारा उपक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
विसर्जन मिरवणुकीत १ हजार २२४ मंडळांचे ध्वनी रीडिंग, कारवाईला सुरूवात – सविस्तर बातमी
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी गणेश इवनाते यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत वसतिगृहातील सर्व विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. विद्यार्थिनींनी आपल्या कल्पकतेला आणि सर्जनशीलतेला मुक्त वाव देत विविध विषयांवर आकर्षक व माहितीपूर्ण भित्तीपत्रके आणि पोस्टर्स तयार केले.
काही विद्यार्थिनींनी विषयानुरूप चित्रांच्या प्रिंटचा कल्पक वापर केला, तर काहींनी स्वतःच्या कलाकौशल्यातून हाताने सुंदर चित्रे रेखाटून त्यासोबत प्रभावी व आकर्षक लिखाण केले. रंगसंगती, कल्पक मांडणी, संदेशाची प्रभावीता आणि सामाजिक विषयांची जाणीव यामुळे विद्यार्थिनींनी साकारलेली भित्तीपत्रके व पोस्टर्स विशेष लक्षवेधी ठरली.
या उपक्रमामुळे विद्यार्थिनींच्या कलागुणांना, सर्जनशीलतेला, कल्पनाशक्तीला आणि सामाजिक जाणिवेला चालना मिळाली. स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थिनींनी आपल्या कलाकौशल्यासोबतच विविध सामाजिक व जनजागृतीपर विषयांबाबतची माहिती प्रभावीपणे मांडली.
स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थिनींचे वसतिगृहाच्या गृहपाल श्रीमती आर. ए. जाधव यांनी विशेष अभिनंदन करून त्यांच्या कलागुणांचे कौतुक केले.























