तरुणाला कोयत्याच्या दांड्याने मारहाण
marathinews24.com
पुणे – पोलिसांचा खबरी असल्याचा आरोप करुन टोळक्याने एका तरुणाला कोयत्याच्या दांड्याने मारहाण केली. टोळक्याने दहशत माजविल्याची घटना लोहगाव येथील विमानतळ परिसरात घडली. याप्रकरणी जाहिद शेख (रा. बर्मा शेल, लोहगाव रस्ता), मोहन उर्फ तम्मा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. सतीश रमेश टिळे (वय २५, रा. साई कृपा सोसायटी, सोमनाथनगर, वडगाव शेरी) याने विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
डाॅक्टरांकडून १४ लाखांची खंडणी उकळली; महिलेविरुद्ध गुन्हा – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३ ऑक्टोबर रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास तक्रारदार तरुण पुणे विमानतळाजवळील एरोमाॅल परिसरात मोकळ्या जागेत थांबला होता. त्या वेळी आरोपी तेथे आले. ‘तू पोलिसांचा खबरी आहे’, असा आरोप करुन आरोपींनी तरुणाला शिवीगाळ केली. तरुणाला शिवीगाळ केल्यानंतर त्याच्या डोक्यात कोयत्याचा दांडा मारला. कोयत्याचा दांडा मारल्याने तरुण जखमी झाला. त्यानंतर आरोपींनी परिसरात दहशत माजविली. तरुणाला जीवे मारण्याची धमकी देऊन आरोपी पसार झाले. पोलीस उपनिरीक्षक गाडे तपास करत आहेत.























