दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर नगरपरिषदेचा उपक्रम
marathinews24.com
बारमती – Baramati Wastewater Reuse : शहर अधिकाधिक हरित, स्वच्छ आणि पर्यावरणस्नेही ठेवण्यासाठी तसेच दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर बारामती नगरपरिषदेने सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर करण्याचा महत्त्वपूर्ण उपक्रम हाती घेतला आहे. पिण्याच्या पाण्याचा अपव्यय टाळणे, उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करणे आणि त्याचवेळी बारामती शहर अधिकाधिक स्वच्छ व हिरवेगार ठेवणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
पुण्यात २२ ऑक्टोबरला ‘सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज’चे जनजागृती सत्र – सविस्तर बातमी
सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पातून शुद्ध केलेले पाणी शहरातील झाडे, उद्याने आणि हिरवळ जोपासण्यासाठी वापरण्यात येत असून, नागरिकांनी या उपक्रमाला सकारात्मक प्रतिसाद देऊन सहकार्य करावे. Baramati Wastewater Reuse सध्या सर्वत्र दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाल्याने बारामती शहरातील नगरपरिषदेच्या माध्यमातून होणाऱ्या दैनंदिन पाणी पुरवठ्यामध्ये कपात करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत पिण्याच्या पाण्याची बचत करण्याच्या उद्देशाने सांडपाण्यावर प्रक्रिया करून पुनर्वापरासाठी उपलब्ध केलेल्या पाण्याचा उपयोग स्वच्छता, झाडे आणि उद्यानांच्या सिंचनासाठी केला जात आहे.
शहरातील स्वच्छता आणि सौंदर्य अबाधित राखण्यासाठी दररोज सरासरी लाखो लिटर प्रक्रिया केलेल्या पाण्याचा वापर करण्यात येत आहे. सांडपाण्यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया केली जात असली, तरी हे पाणी केवळ स्वच्छता, झाडे, उद्याने आणि हिरवळ जोपासण्यासाठी वापरण्यायोग्य आहे. ते पिण्यासाठी किंवा वैयक्तिक वापरासाठी योग्य नाही. त्यामुळे नागरिकांनी या पाण्याचा पिण्यासाठी वापर करू नये, तसेच प्रक्रिया केलेल्या पाण्याबाबत कोणताही गैरसमज अथवा चुकीची धारणा करून घेऊ नये. शहराच्या शाश्वत विकासासाठी राबविण्यात येत असलेल्या या उपक्रमाला सर्व नागरिकांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन सहकार्य करावे, असे आवाहन बारामती नगरपरिषदेचे मुख्याधिकारी पंकज भुसे यांनी केले आहे.




















