Breking News
Pune Mahalakshmi Temple Gold Saree : सुवर्णवस्त्रांनी सजली सारसबागेसमोरील श्री महालक्ष्मी देवीMakarand Anaspure : विद्यार्थीपण आहे तोपर्यंतच जगण्याला अर्थ- मकरंद अनासपुरेMLC Election 2026 : विधान परिषदेच्या ५ पदवीधर व शिक्षक मतदारसंघांसाठी २३ ऑक्टोबरला मतदानBaramati Wastewater Reuse : बारामतीत सांडपाण्यावर प्रक्रिया केलेल्या पाण्याचा पुनर्वापरPune News : पुण्यात २२ ऑक्टोबरला ‘सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज’चे जनजागृती सत्रPune Assault Cases : महिला पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण; कोरेगाव पार्कमधील घटनाPune Post Office : टपाल विभागाच्यावतीने २७ ऑक्टोबरला पेन्शन अदालतीचे आयोजनYerawada Drainage Pit Death Case : येरवड्यात खड्ड्यात पडून ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यूPune Fodder Production Plan : पुणे जिल्ह्यात २५ हजार एकरांवर चारा उत्पादनाचे नियोजनPune Police : पुण्यातील १० गुन्हेगारांना तडीपारीचा दणका

Makarand Anaspure : विद्यार्थीपण आहे तोपर्यंतच जगण्याला अर्थ- मकरंद अनासपुरे

Makarand Anaspure

भरत-रोटरी करंडक स्पर्धेचे पारितोषिक आणि संस्था पुरस्कारांचे वितरण

marathinews24.com

पुणे – रंगमंचावरील धुपाचा वास, तिसरी घंटा ऐकली की कलाकरांची समाधी लागते. धडपडीतून कलावंत बनण्याचा प्रयत्न हा अवर्णनीय असतो. आपल्याला जे म्हणायचे असते, समाजाविषयी जे मांडायचे असते ते तरुण मंडळी कलेच्या माध्यमातून रंगमंचावर मांडत असतात. जेथे व्यक्त होण्याचा प्रयत्न केला जात असतो ती आपली खरी जागा असते, असे प्रतिपादन प्रख्यात सिने-नाट्य अभिनेते मकरंद अनासपुरे (Makarand Anaspure) यांनी केले. आयुष्यात विद्यार्थीपण आहे तोपर्यंतच जगण्याला खरा अर्थ आहे. एकदा ते विद्यार्थीपण संपले की अस्तित्व उरत नाही. असे होऊ नये याची प्रत्येकाने काळजी घ्यावी, असा सल्लाही त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.

विधान परिषदेच्या ५ पदवीधर व शिक्षक मतदारसंघांसाठी २३ ऑक्टोबरला मतदान – सविस्तर बातमी 

१३२ वर्षांची अखंडित कारकीर्द असलेल्या भरत नाट्य संशोधन मंदिर या एकमेव मराठी नाट्य संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त दिल्या जाणाऱ्या संस्था पुरस्कारांचे वितरण आणि भरत-रोटरी एकांकिका स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ सोमवारी (दि. १९) आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी मकरंद अनासपुरे Makarand Anaspure बोलत होते. पु. ल. देशपांडे अकॅडमीच्या संचालक मीनल जोगळेकर, रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१चे प्रांतपाल नितीन ढमाले, भरत नाट्य मंदिराचे अध्यक्ष पं. पांडुरंग मुखडे, उपाध्यक्ष भाग्यश्री देसाई, कार्याध्यक्ष अभय जबडे, राजेंद्र उत्तुरकर तसेच परिक्षक संजय डोळे, नरेंद्र आमले, रश्मिता शहापूरकर मंचावर होते. भरत नाट्य मंदिरात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

भरत नाट्य संशोधन मंदिराच्या प्रदीर्घ वाटचालीचा आणि रोटरी क्लबचा गौरव करून मकरंद अनासपुरे म्हणाले, सामाजिक कार्य करणारी मंडळी निरपेक्ष भावनेने कार्य करीत असतात. आपल्याला नेहमी प्रश्न पडतो की, आभाळाचे झुंबर पडत का नाही त्यामागचे कारण म्हणजे नि:स्वार्थ भावनेने कार्य करीत असलेली मंडळी. त्यामुळे आपला समाज टिकून आहे. भरत नाट्य संशोधन मंदिरात प्रदीर्घ कार्य करणारे विठ्ठल हुलावळे यांच्या कार्याचा अनासपुरे यांनी विशेष गौरव केला.

मीनल जोगळेकर म्हणाल्या, राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे जे कलावंत आपल्या कलेच्या माध्यमातून निधी संकलनासाठी सहकार्य करतील त्यांना राज्य शासनाने मुंबईतील रवींद्र नाट्य मंदिर मोफत उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी पु. ल. देशपांडे अकादमी सहकार्य करणार आहे. जोगळेकर यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत भरत नाट्य संशोधन मंदिराच्या वतीने तीन नाटकांचा महोत्सव आयोजित करण्याची ग्वाही कार्याध्यक्ष अभय जबडे यांनी या वेळी दिली.

नितीन ढमाले यांनी रोटरी क्लबच्या सामाजिक उपक्रमांची माहिती विशद केली. भरत नाट्य संशोधन मंदिरातील पडद्यामागील कलाकारांचे पाल्य चिन्मय अमित धुमाळ, श्रेयांश शंतनू कोतवाल, श्रावणी गजानन माळवदकर यांना शिष्यवृत्ती तर सेवाभावी संस्था सहजीवन वृद्धाश्रम आणि डेक्कन इन्स्टिट्यूट ऑफ कॉमर्स यांना आर्थिक मदत देण्यात आली. अनुक्रमे डॉ. दिलीप देवधर आणि धनंजय बर्वे यांनी ही मदत स्वीकारली. चारुलता पाटणकर, डॉ. प्रचिती सुरू-कुलकर्णी, अभिजित पोतनीस यांनी सूत्रसंचालन केले.

स्पर्धेचा सविस्तर निकाल 

सांघिक प्रथम : भिरभिर (प्रा. रामकृष्ण मोरे महाविद्यालय), द्वितीय : हँडल विथ केअर (पी. व्ही. पी. आय. टी. पद्म कला मंडळ), तृतीय : लाजाळू (भारती विद्यापीठ फाईन आर्ट्‌स महाविद्यालय), उत्तेजनार्थ : स्किम (मराठवाडा शंकरराव चव्हाण विधी महाविद्यालय), काही प्रॉब्लेम ये का? (रसाभिमान, अहिल्यानगर)
लेखन प्रथम : प्रतिक्षा शेलार (क्षतिपूर्ती), द्वितीय : मुकुल ढेकळे (स्किम), उत्तेजनार्थ : दिपाली धुमाळ (आठवडे बाजार),
दिग्दर्शन प्रथम : युसुफअली अब्दुल रझाक शेख (भिरभिर). द्वितीय : स्वानंदी भारताल, पवन पोटे (लाजाळू), उत्तेजनार्थ : आश्विन ठाकूर (हँडल विथ केअर).
अभिनय : पुरुष : प्रथम : दर्शन यादव, द्वितीय : पवन पोटे, अभिनय : स्त्री : प्रथम : सुप्रिया यादव, द्वितीय : स्वानंदी भारताल
लक्षवेधी अभिनय पुरुष युसुफअली अब्दुल रझाक शेख, लक्षवेधी अभियन : स्त्री : तनिष्का देशमुख
प्रकाशयोजना प्रथम : निखिल मारणे, द्वितीय : ओंकार लाटे
ध्वनीसंयोजन प्रथम : संस्कार फडके, द्वितीय : वेदांत चौरे, नेपथ्य प्रथम : विक्रांत मुंढे, हरिष चेन्निलीवार, द्वितीय : ऋतुजा बोठे

संस्था पुरस्कारांचे मानकरी

कै. अप्पासाहेब ताम्हणकर स्मरणार्थ उत्कृष्ट नाट्य कलावंत – अजिंक्य कुलकर्णी, कै. बबनराव गोखले स्मरणार्थ उत्कृष्ट संगीत वादक – स्वप्निल कुंभार, कै. उदयसिंह पाटील स्मरणार्थ सर्वोत्कृष्ट बालकलाकार – गार्गी वैद्य, कै. गोपाळराव लिमये स्मरणार्थ संस्था कलाकार (नियोजन) – प्रदीप रत्नपारखे, गुणवंत संस्था कलाकार – विश्वास पांगारकर, कै. अवधूत घाटे स्मरणार्थ संस्था कलाकार – कौशिक कुलकर्णी, कै. गो. रा. जोशी स्मरणार्थ सौ. तेजा काटदरे पुरस्कृत नाट्यसमीक्षक/अभ्यासक – नीला शर्मा, श्रीकांत चौगुले पुरस्कृत नाट्यविषयक कारकीर्द – राजीव परांजपे, अभय जबडे पुरस्कृत रंगकर्मी पुरस्कार – विठ्ठल हुलावळे

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×