देवीला १६ किलो सोन्याची साडी परिधान
marathinews24.com
पुणे – Pune Mahalakshmi Temple Gold Saree : सबागेसमोरील श्री महालक्ष्मी देवीला परिधान करण्यात आला. सुवर्णवस्त्रांनी सजलेले हे महालक्ष्मी देवीचे रूप पाहण्यासोबतच दर्शनाकरिता पुणेकरांनी मोठे गर्दी केली. श्री महालक्ष्मी मंदिर, सारसबाग तर्फे वर्षातून दोन वेळा म्हणजेच दसरा आणि लक्ष्मीपूजन या दिवशी देवीला ही साडी परिधान करण्यात येते. ट्रस्टचे प्रमुख संस्थापक आणि विश्वस्त राजकुमार अग्रवाल, प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल, विश्वस्त ॲड. प्रताप परदेशी, विश्वस्त व उत्सव प्रमुख डॉ. तृप्ती अग्रवाल, विश्वस्त भरत अग्रवाल, प्रवीण चोरबेले, हेमंत अर्नाळकर, नारायण काबरा, राजेश सांकला, रमेश पटोदिया, राजकुमार चमडीया, निलेश लद्दड यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी यंदाच्या उत्सवाचे आयोजन केले आहे.
विद्यार्थीपण आहे तोपर्यंतच जगण्याला अर्थ- मकरंद अनासपुरे – सविस्तर बातमी
प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल म्हणाल्या, पुरातन काळापासून दसऱ्याच्या दिवशी सोने लुटण्याची परंपरा आहे. त्या परंपरेनुसार सोन्याच्या साडीत श्री महालक्ष्मी देवीचे दर्शन भाविकांना व्हावे, याकरिता ही साडी देवीला नेसवली जाते. (Pune Mahalakshmi Temple Gold Saree) हैद्राबाद मध्ये साडीची कलाकुसर साकारण्यात आली असून सुमारे ६ महिने काम सुरु होते. आकर्षक नक्षीकाम करून ही साडी देवीसाठी साकारण्यात आली आहे. त्यामुळे सुवर्णवस्त्रातील हे रूप भाविकांना दसऱ्याच्या दिवशी दिवसभर पाहण्याची संधी मिळणार आहे.
उत्सव प्रमुख डॉ. तृप्ती अग्रवाल म्हणाल्या, सुमारे २ किलो सोन्याच्या मुकुटावर करण्यात आलेले अतिशय सुबक आणि नाजूक नक्षीकाम हे विशेष लक्षवेधी आहे. पारंपरिक धार्मिक संकल्पना, उत्कृष्ट सुवर्णकारिता आणि कलात्मक सौंदर्य यांचा सुंदर संगम या मुकुटामध्ये पाहायला मिळतो. दसऱ्याच्या निमित्ताने भाविकांसाठी हा सुवर्ण मुकुट विशेष आकर्षण ठरत असून, श्री महालक्ष्मी देवीच्या दर्शनाला आणखी एक दिव्य आणि वैभवशाली स्वरूप प्राप्त झाले आहे.
प्रतिकात्मक रावण दहन कार्यक्रमाचे आयोजन
मंगळवारी (दि.२०) दसऱ्याला रात्री ९ वाजता मंदिरासमोर प्रतिकात्मक रावण दहन कार्यक्रम होणार असून त्यामध्ये समाजातील वाईट विचार, व्यसनाधीनता यांसारख्या अपप्रवृत्तीरुपी रावणाचे दहन करण्यात येणार आहे. यावेळी रामायण, श्रीराम लीला जिवंत देखावा देखील अनुभविण्याची संधी पुणेकरांना मिळणार आहे. तरी पुणेकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन मंदिर प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.




















