बिबवेवाडीत सराईत टोळक्याने तरुणावर केला गोळीबार
marathinews24.com
पुणे – रस्त्यावर गाडीचा कट लागल्याने झालेल्या वादावादीतून सराईत टोळक्याने तरुणावर गोळीबार केल्याची घटना शनिवारी (दि.१७) मध्यरात्री बिबवेवाडी परिसरात घडली आहे.चार सराईत गुन्हेगारांसह सात जणांच्या टोळक्याने एका तरुणावर मध्यरात्री अडीचच्या सुमारास गोळीबर करुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात खूनाचा प्रयत्न आणि आर्म ॲक्टनूसार गुन्हा दाखल झाला आहे.याप्रकरणी दोघा आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.
भागीदारीमध्ये व्यावसायाचे आमिष दाखवले, तरुणाची १ कोटी ३२ लाखांची फसवणूक – सविस्तर बातमी
रोहन उर्फ बळ्या राजु गाडे, सनी उर्फ ऋषीकेश अनिल शिंदे, शंकर उर्फ बाबु कैलास पंधेकर, अक्षय शैलेंद्र भालके , बंटी म्हस्के, देवा डोलारे आणि गणेश भालके यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील देवा डोलारे आणि गणेश भालके यांना ताब्यात घेतले आहे. इतर आरोपींच्या शोधार्थ पथके रवाना करण्यात आली आहेत. अमित महाविर लकडे (वय २८,रा.अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी) यानी तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अमित लकडे याचे दाजी उमेश शिंदे व गणेश सुर्यवंशी यांनी अक्षय भालकेविरुध्द पोलिसांत तक्रार दिली होती. तसेच फियादीच्या गाडीचा कट लागल्याने त्यांच्याशी वाद झाला होता. याचा राग मनात धरुन शनिवारी मध्यरात्री अमित घराकडे जात असताना आरोपींनी त्याला गाठले. त्याला धारदार शस्त्राचा धाक दाखवून तसेच लाथा बुक्यांनी आणि काठीने बेदम मारहाण केली. यानंतर बाळा गाडे याने अमितच्या दिशेने पिस्तूलातून गोळीबार केला. मात्र गोळी लागली नसल्याने ते बचावले. याप्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे.