Breking News
Khed Solar Agriculture Project : शेतकऱ्यांना पाणी अन् आधुनिक तंत्रज्ञानाच्या सुविधा देण्यावर शासनाचा भर- उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवारPanmandwadi Solar Project : सौर प्रकल्पांतून शेतीसाठी दिवसा वीज;शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत– सुनेत्राताई पवारCA Anuj Goyal Pune : जागतिक अर्थव्यवस्थेत भारतीय सनदी लेखापालांचे योगदान मोलाचेPune House Burglary Case : चार राज्यात तपास, दोघांना उत्तर प्रदेशातून बेड्याPune Mangalsutra Theft Case : पादचारी महिलेचे मंगळसूत्र हिसकावले; सराईत जेरबंदDiwali Eye Safety Tips : फटाक्यांच्या ठिणग्यांमुळे कायमस्वरूपी अंधत्वाचा धोका-नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. अनिल दूधभातेपायल झांबरे आत्महत्या प्रकरणात सासू-सासरा अटकेतMercedes Benz Electric GLC Chakan : महाराष्ट्राला भविष्यातील मोबिलिटीचे जागतिक केंद्र बनविण्याचे उद्दिष्ट – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसDr Neelam Gorhe Congress Statement : काँग्रेसच्या राजकीय संस्कृतीत महिला सन्मानाला स्थान आहे का-डॉ. नीलम गोऱ्हेBaramati Revenue Lok Adalat 2026 : प्रलंबित महसुली दावे निकाली काढण्यासाठी ३ डिसेंबर रोजी महात्मा फुले महसूल लोकअदालत

सहकारी बँकांनी ग्राहकाभिमुख व लोकाभिमुख व्हावे – उपमुख्यमंत्री अजित पवार

उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते रामराज्य सहकारी बँकेच्या मुख्य कार्यालय आणि बिबवेवाडी शाखेच्या वास्तूच्या कोनशीलेचे उद्घाटन

marathinews24.com

पुणे – जागतिक, राष्ट्रीय, जिल्हा तसेच आणि सहकारी संस्था असे बँकांचे जाळे निर्माण झाले असून बँकिंग क्षेत्रात स्पर्धेच्या युगातील आमुलाग्र बदल विचारात घेता सहकारी बँकांनी ग्राहकाभिमुख व लोकाभिमुख झाले पाहिजे, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केले.

मागेल त्याला शेततळे योजनेच्या अनुदानात वाढ करण्यासाठी प्रयत्नशील- उपमुख्यमंत्री अजित पवार – सविस्तर बातमी

बिबवेवाडी येथे रामराज्य सहकारी बँकेच्या मुख्य कार्यालय आणि बिबवेवाडी शाखेच्या वास्तूच्या कोनशीलेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर, आमदार चेतन तुपे, राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर, रामराज्य सहकारी बँकेचे संस्थापक ॲड. सुभाष मोहिते, विजय मोहिते, अध्यक्षा नंदा लोणकर, उपाध्यक्ष शिरीष मोहिते, संचालक मंडळ परिसरातील मान्यवर उपस्थित होते.

पवार म्हणाले, राज्यात सहकारी चळवळ वाढविण्यामध्ये धनंजय गाडगीळ, विठ्ठलराव गाडगीळ, वैकुंठभाई मेहता, माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, वसंतराव नाईक, विलासराव देशमुख, शरद पवार यांचे मोठ्या प्रमाणात योगदान आहे. सध्या प्रचलित असलेल्या सहकार कायद्यात काळानुरूप बदल करण्याची गरज आहे. सहकार क्षेत्राशी निगडित असलेल्या प्रत्येक घटकाला न्याय देण्याचे काम सहकार कायद्यातून झाले पाहिजे. त्यासाठी कायद्यात प्रत्येक क्षेत्राशी निगडित नवीन ‘प्रकरणे’ दाखल करावी लागणार आहेत.

सहकार कायद्यातील आवश्यक बदलांसाठी समितीची स्थापना करण्याचा निर्णय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यावर सकारात्मक विचार करुन निर्णय घेण्यात येईल. सहकारी बँकेने आपल्या व्यवहारात मानवी चेहरा देण्याचे काम केले आहे, सहकारी क्षेत्रातील बँकेने अपेक्षित उद्दिष्टांपेक्षा अधिक नफा मिळविण्यास प्रोत्साहन देण्याचा राज्य शासनाचा विचार आहे.

रामराज्य सहकारी बँक मागील २५ वर्षापासून सर्वसामान्य नागरिकांना पुढे आणून त्यांची पत निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे. यामध्ये संचालक मंडळ, सभासद कर्जदारांचे फार मोठे योगदान आहे. सभासदांचे हित जपणे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. बँकेने ठेवी वाढविण्यासोबत खात्रीलायक कर्जदार मिळविण्याकरिता प्रयत्न करावे. नागरिकांना पारदर्शक पद्धतीने सुलभ सेवा देण्याचा प्रयत्न करावा. बँकिंग व्यवसायात विश्वासर्हता जपणे गरजेचे आहे. तरुणांना संधी देऊन त्यांना बँकीग क्षेत्राचे प्रशिक्षण देण्याचे काम करावे. थकीत कर्जाकडे बारकाईने लक्ष द्यावे. दिवसेंदिवस सायबर गुन्ह्याच्या प्रमाणात वाढ होत असून सहकारी बँकांनी राज्य सहकारी बँकेसोबत संलग्न झाले पाहिजे, असेही पवार म्हणाले.

संस्थापक विजय मोहिते यांनी प्रास्ताविकात रामराज्य सहकारी बँकेच्या शहरासह ग्रामीण भागात एकूण ८ शाखा असून नागरिकांना बँकिंग सुविधा पारदर्शक पद्धतीने देण्यात येत आहे, असे म्हणाले. लोणकर यांनी स्वागतपर मनोगत व्यक्त केले तर ॲड. मोहिते यांनी बँकेच्या वाटचालीबद्दल माहिती दिली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×