“येरवडा कारागृहातील बंद्यांचे आशियाई बुद्धिबळ स्पर्धेत यश

"येरवडा कारागृहातील बंद्यांचे आशियाई बुद्धिबळ स्पर्धेत यश

भारताचे जागतिक प्रतिनिधित्व करण्याचा मिळाला मान”

marathinews24.com

पुणे – इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड, पुणे यांच्या “परिवर्तन – प्रिझन टू प्राइड” उपक्रमांतर्गत दि. 23 मे रोजी FIDE या जागतिक बुद्धिबळ संघटनेतर्फे आयोजित आशियाई आंतरकारागृह ऑनलाईन बुद्धिबळ स्पर्धा संपन्न झाल्या. स्पर्धेत येरवडा मध्यवर्ती कारागृहातील बंद्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत “रौप्य पदक” पटकावले. विशेष म्हणजे, यामुळे येरवडा कारागृहातील संघास येत्या ऑक्टोबर २०२५ मध्ये होणाऱ्या जागतिक आंतरकारागृह ऑनलाईन बुद्धिबळ स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करण्याचा मान मिळाला आहे.

शेतीमध्ये भांडवली गुंतवणुकीसाठी दरवर्षी पाच हजार कोटी रुपये देणार- कृषीमंत्री ॲड.माणिकराव कोकाटे – सविस्तर बातमी 

यापूर्वीही येरवडा कारागृहाने २०२२ मध्ये कास्य पदक आणि २०२३ मध्ये सुवर्णपदक पटकावून राष्ट्रीय स्तरावर वर्चस्व प्रस्थापित केले होते. येरवडा मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक सुनिल एन. ढमाळ यांनी अभिनंदन करत सर्व सहभागी बंद्यांचे कौतुक केले. आगामी जागतिक स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. स्पर्धकांना ग्रँडमास्टर अभिजित कुंटे ईशा करवडे यांचे मार्गदर्शन लाभले.

"येरवडा कारागृहातील बंद्यांचे आशियाई बुद्धिबळ स्पर्धेत यश

“परिवर्तन – प्रिझन टू प्राइड” उपक्रमाची संकल्पना अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा डॉ. सुहास वारके विशेष पोलीस महानिरीक्षक (कारागृह) डॉ. जालिंदर सुपेकर यांच्या मार्गदर्शनातून विकसित झाली असून कारागृह उपमहानिरीक्षक स्वाती साठ यांचे सहकार्य लाभले आहे. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी सुनिल एन. ढमाळ, पी.पी. कदम, डॉ. भाईदास ढोले, आर.ई. गायकवाड, उपअधीक्षक ए.एस. कांदे, यांचे योगदान मोलाचे ठरले. इंडियन ऑइलकडून केतन खैरे (प्रशिक्षक), सागर मोहिते (सहाय्यक प्रशिक्षक), पवन कातवडे (स्पर्धा पंच) योगेश परदेशी (समन्वयक) यांनीही महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. ही कामगिरी केवळ स्पर्धात्मक यश नसून, बदल व सशक्तीकरणाच्या दिशेने एक सकारात्मक पाऊल ठरली आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top