Breking News
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त वाहतुकीत बदलसाहित्यरत्न लोकशातिर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीच्या पूर्वसध्येला समाजरत्न पुरस्कार समारंभपुण्यात १२ हजार ७५० विद्यार्थ्यांना मिळणार ‘अंकनाद गणित सात्मीकरण प्रणालीबालमैत्रीपूर्ण आश्रमशाळा उपक्रम आदिवासी मुलांसाठी संरक्षणात्मक वातावरण करण्यास उपयुक्त-प्रदीप देसाईखराडी पार्टी प्रकरणात पोलिसांची कारवाई एकतर्फीछत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना; यवतमध्ये ३१ जुलैला रस्ता रोकोॠषिकेश ते रामेश्वरम गौ राष्ट्र यात्रेचे पुण्यात उत्साहात स्वागतसैनिक व त्यांच्या कुटुंबांच्या सन्मानासाठी विधी सेवा चिकित्सालय केंद्राचे ठोस पाऊल – आयुक्त पुलकुंडवारजिल्ह्यातील वनपर्यटनात मोठ्या क्षमता; पर्यावरणपूरक पद्धतीने पर्यटकांसाठी सुविधा निर्माण कराव्यातलायन्स क्लब पूना शिवाजीनगरच्या अध्यक्षपदी डॉ. गणेश खामगळ यांची निवड

पालखी सोहळ्यानिमित्त वाहतूकीत बदल, साडेसहा हजारांचा पोलीस बंदोबस्त

पालखी सोहळ्यानिमित्त वाहतूकीत बदल, साडेसहा हजारांचा पोलीस बंदोबस्त

पुणेकरांनो सहकार्य करा-पोलीस आयुक्त अमितेश कुमार

marathinews24.com

पुणे – संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगतगुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यानिमित्त तब्बल साडेसहा पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात केला आहे. त्यासोबतच महिला सुरक्षिततेसाठी गुन्हे शाखेची विविध पथके दक्ष आहेत. तसेच पालखीच्या अनुषंगाने शहरातील विविध भागात २० ते २३ जून कालावधीत वाहतूकीत बदल केले आहेत. जागोजागी ट्राफिक वळविले असून, पुणेकरांनी सहकार्य करण्याचे आवाहन पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषदेत केले. यावेळी सहआयुक्त डॉ. रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, वाहतूक पोलीस उपायुक्त अमोल झेंडे उपस्थित होते.

पालखी सोहळ्याच्या अनुषंगाने वाहतूक बदलाबाबत जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी – सविस्तर बातमी 

पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले, पालखी सोहळा २० जूनला पुणे मुक्कामी येणार असून, त्यादृष्टीने स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखा, क्युआरटी, बीडीडीएस पथक, पोलीस अमलदार असा ६ हजार ७८० हून अधिक बंदोबस्त तैनात केला आहे. त्यासोबत १ हजार २५० होमगार्ड, एसआरपीएफ तुकडी आहे. महिलांच्या सुरक्षिततेसह चेनस्नॅचिंग रोखण्यासाठी विशेष पथके तैनात केली असून, दोन्ही पालखी सोहळ्याला गुन्हे शाखेच्या साध्या वेशातील अधिकारी-कर्मचार्‍यांचे कवच असणार आहे. पालखी सोहळ्याचे लाईव्ह ट्रॅकिंगही केले जाणार असून, त्यामुळे वाहतूककोंडी रोखण्यासाठी मदत होणार आहे. पोलीस नियंत्रण कक्ष, सीसीटीव्ही फुटेज, मोबाइल व्हॅनद्वारे वारकर्‍यांच्या गर्दीवर नियंत्रण ठेवले जाणार आहे. आपत्कालीन परिस्थिती घडू नये, यासाठी विशेष खबरदारी घेतल्याचे त्यांनी सांगितले.

पुणेकरांनो जाणून घ्या, वाहतूकीतील बदल

पालखी सोहळ्याच्या अनुषंगाने १९ जून रात्री दहा ते २३ जून संध्याकाळी अकरा दरम्यान अवजड, डंपर, मिक्सर वाहनांना शहरात प्रवेशबंदी केली आहे. अत्यावश्यक वाहने वगळता खालील चौकात वाहतूक बंदी केली आहे. बोपोडी चौक, राजीव गांधी चौक, औंध, ब्रेमेन चौक औध, बोपखेल फाटा विश्रांतवाडी, खराडी बायपास चौक, केसनंद गाव, केसनंद फाटा चौक वाघोली, लोणीकंद थेउर फाटा, तुळापूर फाटा लोणीकंद, राधा चौक बाणेर, सुस रोड बाणेर, चांदणी चौक पौड रोड, वारजे जंक्शन, वडगाव ब्रीज धायरी, नवले ब्रीज, भुमकर चौक कात्रज, कात्रज चौक, खडी मशीन चौक कोंढवा, मंतरवाडी फाटा कात्रज, वैदवाडी चौक हडपसर, थेउर फाटा, दिवे घाट, रविदर्शन हडपसर याठिकाणी प्रवेश बंदी आहे.

पालखी सोहळ्याच्या अनुषंगाने पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात केला आहे. विशेषतःटेक्सॅनोव्हीचा उपयोग करून गर्दीवर नियंत्रण ठेवणे, वारकर्‍यांच्या सुरक्षिततेसाठी प्राधान्य दिले आहे. त्यासोबतच शहरात ठिकठिकाणी वाहतूकीत बदल केला आहे. वाहतूक बदलामुळे नागरिकांनी पर्यायी मार्र्गांचा अवलंब करावा. वारकर्‍यांसह भाविकांना त्रास होणार नाही, याबाबत खबरदारी घेउन पोलिसांना सहकार्य करावे. – अमितेश कुमार, पोलीस आयुक्त, पुणे शहर

संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी आगमन (२० जून मध्यरात्री दोनपासून बंद रस्ते)

श्री. क्षेत्र आळंदी देवाची येथुन संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा २० जूनला वडमुखवाडी, चर्‍होली फाटा, दिघी मॅगझीन, म्हस्के वस्ती कळस ओढा, विश्रांतवाडी, फुलेनगर, साप्रस चौकी, चंद्रमा चौक, संगमवाडी रोडने पाटील इस्टेट चौकातून इंजिनिअरिंग कॉलेजच्या दिशेने मार्गस्थ होणार आहे. त्यामुळे २० जूनला पहाटे तीन वाजेपासून खालील रस्ते बंद ठेवले जाणार आहेत. कळस फाटा ते बोपखेल फाटा /विश्रांतवाडी चौक-मेंटल हॉस्पीटल कॉर्नर ते आळंदी रोड जंक्शन -सादलबाबा दर्गा ते पाटील इस्टेट रोड – चंद्रमा चौक ते आळंदी रोड -नविन आंबेडकर सेतू ते चंद्रमा चौक, होळकर ब्रीज ते चंद्रमा चौक व साप्रस चौकी रस्ता बंद ठेवला जाणार आहे. सादलबाबा दर्गा चौक, येरवडा ते पाटील इस्टेट दरम्यानच्या कालावधीमध्ये रस्ते वाहतूकीसाठी बंद ठेवले जाणार आहेत.

दोन्ही पालख्यांचे एकत्रित मार्ग पुणे-मुंबई रोडने इंजिनियरींग कॉलेज चौक, संचेती चौक, सिमला ऑफीस चौक, वीर चाफेकर चौक, ज्ञानेश्वर पादुका चौक, तुकाराम पादुका चौक, गुडलक चौक, खंडोजीबाबा चौक, टिळक चौक, लक्ष्मी रोडने विजय टॉकीज चौक, सदन चौक, बेलबाग चौक, बुधवार चौक, पासोडया विठोबा मंदीर, मोती चौक, सोन्या मारुती चौक, हमजेखान चौक, मारुती चौक, नानापेठ पोलीस चौकीजवळ आल्यानंतर संत तुकाराम महाराजांची पालखी अरुणा चौक मार्गे निवडुंगा विठोबा मंदीर येथे जावून मुक्काम करणार आहे. संत श्री ज्ञानेश्वर महाराजांची पालखी अशोक चौक मार्गे पालखी विठोबा मंदीरात मुक्कामी असणार आहे .

संत श्रेष्ठ तुकाराम महाराज आणि संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा निवडुंग्या विठोबा मंदीर, नाना पेठ आणि पालखी विठोबा मंदीर, भवानीपेठ, पुणे येथे मुक्कामाला आहे. त्यामुळे आवश्यकतेनुसार रस्ते वाहतूकीसाठी बंद करण्यात येणार आहेत. तसेच रेंजहिल चौक ते संचेती चौक (गणेश खिंड रोड )- खंडोजीबाबा चौक ते वीर चाफेकर चौक (फर्ग्युसन रस्ता)-गाडगीळ पुतळा ते स. गो बर्वे (शिवाजी रोड)-चाफेकर चौक ते वाकडेवाडी भुयारी मार्ग – डेक्कन वाहतूक विभाग ते मॉर्डन कॉलेज रस्ता कुंभारवेस चौक- शाहीर अमर शेख चौक वाहतूकीसाठी बंद ठेवला जाणार आहे.

संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यासाठी बंद रस्ते (१९ जून रात्री दहा वाजेपासून)

संत श्री. तुकाराम महाराज पालखी २० जूनला विठ्ठल मंदिर आकुर्डी येथुन निघुन चिंचवड- पिंपरी वल्लभनगर नाशिक फाटा, फुगेवाडी, दापोडी, हॅरीस ब्रिज, बोपोडी चौक, खडकी रेल्वे स्टेशन, मरिआई गेट चौक, वाकडेवाडी पाटील इस्टेट चौक, इंजिनिअरींग कॉलेज चौक मार्गाने येणार आहे. त्यामुळे १९ जूनला रात्री दोन वाजेपासून वाहतूकीसाठी रस्ते बंद ठेवले जाणार आहेत.

तुकाराम पादुका चौक ते बेलबाग चौक (बंद रस्ते)

टिळक चौक ते विर चाफेकर चौक (फर्ग्युसन रोड)- शनिवारवाडा ते स.गो बर्वे संचेती चौक (शिवाजी रोड)- कुंभार वेस चौक ते गाडगीळ पुतळा चौक -शास्त्री रोड सेनादत्त चौकी- शेलारमामा चौक ते खंडोजीबाबा चौक -टिळक रोड पूरम चौक ते अलका टॉकीज चौक-लक्ष्मी रोड – बेलबाग चौक ते टिळक चौक शिवाजी रोड – जिजामाता चौक ते बुधवार चौक- बेलबाग चौक बेलबाग- लक्ष्मी रोड -संत कबीर चौक – शनीपार चौक ते सेवा सदन चौक -नेहरू चौक -सोन्या मारूती चौक रस्ता बंद ठेवला जाणार आहे.

पुण्यात पालखी मुक्कामी वाहतूकीचे इतर निर्बंध

निवडूंग्या विठोबा मंदीर आणि पालखी विठोबा मंदीर परिसरात् २० ेते २२ जून सकाळी अकरापर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांना ये-जा करण्यास व पार्कंग करण्यास मनाई आहे. परिसरातील वाहतूक भाविकांच्या गर्दीनुसार आवश्यकतेप्रमाणे वळविण्यात येणार आहे. वाहतूकीची कोंडी होवू नये यासाठी सर्व नागरीकांनी वाहतूक व्यवस्थेतील बदल अंमलात आणून तसेच पोलीसांनी त्या-त्यावेळी दिलेल्या सूचनांचे पालन करून सहकार्य करावे.

पालखी सोहळ्यातील वाहन चालकांसाठी सूचना

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील वाहन चालकांनी पर्यायी रस्तांचा वापर करावा. २० जूनपासून आळंदीहून विश्रांतवाडीकडे येणार्‍या वाहनांनी मरकळ- तुळापूर-फुलगाव-लोणीकंद-वाघोली-लोहगाव-येरवडा परिसरातील रस्त्यांचा वापर करावा. तसेच २२ जूनला पुण्याहून-सासवडच्या दिशेने जाताना वाहन चालकांनी भैरोबानाला-लुल्लानगर चौक- कोंढवा खडीमशीन चौक- बोपदेव घाट मार्गे सासवड किंवा मंतरवाडी फाटा- फुरसुंगी मार्गे उंड्री-पिसोळी- खडी मशीन चौक मार्गे बोपदेव घाटाकडून सासवड मार्गाचा वापर करावा.

पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील विविध ठिकाणी वाहतूकीत बदल केले आहेत. वाहतूक अमलदारांसह अधिकार्‍यांकडून दिवसरात्र चौका-चौकात नियमन केले जाणार आहे. नागरिकांसह स्थानिकांनी वाहतूक अमलदारांना सहकार्य करावे.
अमोल झेंडे, वाहतूक उपायुक्त

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top