Breking News
फ्लाईंग जिप्सी कॅफेला दणका, तोपर्यंत बंद ठेवणारपुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे ‘अतिउत्कृष्ट सेवा पदक’हाफकिन संस्थेला गतवैभव मिळवून देण्यासाठी शासन कटिबद्ध – राज्यमंत्री योगेश कदममहा वॉकेथॉन २०२६-वॉक फॉर वॉटर मध्ये नागरिकांनी सहभागी व्हावेसिंहगड रस्ता भागात घरातून बेकायदा मद्य विक्री; आरोपीला अटकडाॅक्टरांकडे १० लाखांची खंडणी मागणाऱ्या तोतया पत्रकारांविरुद्ध गुन्हाजलसंधारण दिनानिमित्त पुणे जिल्ह्यात विविध उपक्रमांचे आयोजनशीघ्र हस्तक्षेपण व शाळापूर्व तयारीसाठी क्रॉस डिसॅबिलिटी अभ्यासक्रम आराखड्याचे लोकार्पणपुणे जिल्ह्यातील जलसंधारण चळवळ : एक दृष्टीक्षेप…!!टेम्पोच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

खाकीचाच गुटख्यावर डल्ला ?

पिस्तूल बाळगणारा सराईत अटकेत

गुटख्याचे बॉक्स गायब करतानाचे व्हिडीओ व्‍हायरल

marathinews24.com

पुणे – कायद्याचे रक्षण करण्याची जबाबदारी असलेल्या पोलिसांनीच जप्त केलेल्या मुद्देमालाची अफरातफर केल्याचा प्रकार समोर आला आहे. पुणे ग्रामीणमधील राजगड पोलीस ठाण्याशी संबंधित हा धक्कादायक प्रकार आहे. गुटख्याची अवैध वाहतूक करणाऱ्या ट्रकवर कारवाई करून तो जप्त केल्यानंतर त्याच ट्रकमधून काही गुटख्याचे बॉक्स रात्रीच्या वेळी काढून नेण्यात आल्याचा पोलिसांवर आरोप होत आहे. घटनेचे दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याचा दावा करण्यात आला असून, खळबळ उडाली आहे.

केजमधील घरफोडीचा २४ तासांत पोलिसांनी लावला छडा – सविस्तर बातमी

मिळालेल्या माहितीनुसार, मागील वर्षी 22 सप्टेंबर 2025 रोजी राजगड पोलिसांनी गुटख्याने भरलेला ट्रक पकडून त्यावरील मुद्देमालासह वाहन जप्त केले होते. कायदेशीर प्रक्रियेनुसार हा ट्रक पोलीस ठाण्याच्या आवारात उभा करण्यात आला होता. मात्र, त्याच दिवशी रात्री सुमारे दहा वाजण्याच्या सुमारास काही पोलीस कर्मचारी आणि त्यांच्यासोबत असलेल्या खासगी व्यक्तींनी ट्रकमधून पाच ते सहा गुटख्याचे बॉक्स बाहेर काढून कारमध्ये टाकले. याबाबतचा एक व्हिडीओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला आहे. त्‍यामुळे चोरावर-मोर होण्याचा हा प्रकार आता चांगलाच अंगलट आल्‍यसाचे बोलले जात आहे.

महाराष्ट्रात गुटखाबंदी लागू आहे. कारवाई केल्यानंतर जप्त केलेल्या अवैध मुद्देमालाची जबाबदारी पोलिसांवर असते. मात्र, त्याच मुद्देमालावरच डल्ला मारल्याचा आरोप झाल्याने राजगड पोलीस ठाण्याच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. हा प्रकार केवळ शिस्तभंगाचा नसून पोलिसांच्या विश्वासार्हतेलाच तडा देणारा असल्याची चर्चा सुरू आहे. यावेळी नेमके कोणच्‍या सांगण्यावरून जप्‍त मालाची अफरातफर करण्यात आली याचा तपास होणार का असा प्रश्न आता उपस्‍थित होऊ लागला आहे. त्‍यामुळे या गुटखा अफरातफरी मध्ये कोणते कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचा सहभाग होता, कारमधून हा गुटखा कोठे नेण्यात आले हे प्रश्न उपिस्‍थित होत आहे. दरम्‍यान मोहिते यांनी माहितीच्‍या अधिकारात हे व्हिडीओ मिळविल्‍याचा दावा केला आहे.

राजगड पोलीस ठाण्याचे नाव यापूर्वीही वादात आले होते. एक कोटी रुपयांच्या दरोड्याच्या कटप्रकरणात काही पोलीस कर्मचाऱ्यांच्या कथित सहभागाची चर्चा ताजी असतानाच आता जप्त केलेल्या गुटख्याच्या बॉक्सची कथित चोरी समोर आल्याने या पोलीस ठाण्यात नेमके सुरू काय आहे, असा सवाल उपस्थित होत आहे.

संबंधित प्रकारणात तत्‍कालीन पोलिस निरीक्षक इतर अधिकारी व कर्मचारी यांच्‍या विरोधात सहा महिन्यापूर्वी मुख्यमंत्री, पोलिस महासंचालक, ग्रामीण पोलिस अधीक्षक यांना निवेदन दिले होते. दहा दिवसांपूर्वी विशेष पोलिस महानिरीक्षक कोल्‍हापूर या प्रकरणाबाबत ईमेल देखील केला होता. त्‍यावर त्‍यांच्‍या कार्यलयाकडून पोलिस अधीक्षकांना या प्रकरणात लक्ष घालण्यास सांगितले असल्‍याचे मला कळवले होते. सहा महिन्यापूर्वी पुणे ग्रामीण उपविभागीय अधिकारी गौर यांना अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. अद्याप या प्रकरणात कारवाई झाली नाही.

– संतोष मोहिते, अध्यक्ष, शिव प्रहार प्रतिष्ठान

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×