लेखक विक्रम भावे लिखीत दाभोळकर हत्या आणि मी पुस्तकाचे प्रकाशन
Marathinews24.com
पुणे – हिंदुत्ववादी संघटनांची चळवळ मोडीत काढण्याचा डाव मोठ्या वेगाने सुरु असून, त्याविरोधात आपल्याला एकत्रित आले पाहिजे. जशास तसे उत्तर दिले पाहिजे असे मत, भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी व्यक्त केले आहे. दाभोळकर हत्या आणि मी या पुस्तकाचे प्रकाशन भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला हिंदू संघटनेचे अधिवक्ता संजीव पुनाळेकर, सनातन संस्था प्रवक्ते अभय वर्तक उपस्थित होते. एरंडवण्यातील कोहिनूर मंगल कार्यालयात कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
नागपूर महानगरपालिकेच्या बोधचिन्हाच्या अनावरण – सविस्तर बातमी
माधव भंडारी म्हणाले, आपल्या विचारासाठी निष्ठतेने काम करणाऱ्या लोकांविषयी आस्था आहे. दाभोलकर, पानसरे, गौरी लंकेश, कलबुर्गी हत्या एकमेकांशी जोडल्या आहेत.
२००२ मध्ये गुजरात दंगली झाल्यानंतर हिंदू धर्माला बदनाम करण्याचे काम सुरू झाले. याला विरोध करणाऱ्यामध्ये मी असून, २००७ पासून भाजप प्रवक्ता आहे. दरम्यान, २००८ मुंबई हल्ल्यात दहशतवादी कसाब जिवंत सापडला होता. तत्पुर्वी महाराष्ट्र शासनाने ३० जून २००८ बैठक झाली होती. त्याला मंत्र्यासह सगळे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. मुंबईवर या हल्ल्याची पूर्वकल्पना गुप्तचर यंत्रणा यांना मिळाली होती. ती बैठकीत चर्चा करण्यात आली. मात्र तरीही सरकारने दक्षता घेतली नाही. एवढी माहिती असूनही हल्ला कसा होऊ शकतो असा प्रश्न भंडारी यांनी उपस्थित केला आहे. हल्ल्यात सत्ताधारी कॉग्रेसचा वाटा होता. हल्ल्यानंतर त्यावेळेस पंतप्रधान मनमोहन सिंग ते राज्याच्या गृहमंत्रीपर्यत सगळे मूक गिळुन गप्प का बसले होते, असा गंभीर आरोप त्यांनी केला. दरम्यान, मुंबईवर दहशतवादी हल्ला झाल्यानंतर पोलीस अधिकारी हेमंत करकरे मारले गेले होते. त्यावेळी मला हे प्रकरण हिंदुत्ववादी संघटनांशी जोडले जाईल असे मला वाटत होते.
संजीव पुनाळेकर म्हणाले, नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात कळसकर आणि अंदुरे हे निर्दोष असून, त्यांची सुटका केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. या प्रकरणात शेकडो लोकांचे हाल झाले आहेत. हिंदुत्ववादी असणे अपराध आहे का, भावे यांनी लिहलेले हे पुस्तक आपले डोळे उघडणारे आहे. दाभोलकर खूनमध्ये न्याय मिळाला पाहिजे अशी आमची भूमिका आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकांनी देवस्थानच्या जमीन लुबाडल्या आहेत, महाराष्ट्राला खड्ड्यात घालण्याचे काम बारामतीने केले आहे, असा आरोप त्यांनी केला आहे. दरम्यान, पोलिसांनी मशिदीत काय घडते तिकडे पोलीस जात नाहीत. हा पोलिसांचा दुबळेपणा असल्याचे त्यांनी सांगितले.
लेखक विक्रम भावे यांनी हे पुस्तक लिहले आहे. निरापराध हिंदू व्यक्तीच्या सत्यनिष्ठतेची आणि अन्यायाविरूद्धच्या संघर्षाची कहाणी पुस्तकातून मांडण्यात आली आहे. पुस्तकातून सत्य, संघर्ष आणि सत्तेच्या षडयंत्राचे वास्तव उलगडण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. पुस्तक प्रकाशित कार्यक्रमात भावे म्हणाले, नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येपासून ते निकाल लागेपर्यंत त्यांची मुलगी मुक्ता ही कधीही न्यायालयात साक्ष द्यायला आली नाही. दाभोलकर यांचा मुलगा असल्याचा माज हमीदने मीडियाच्या माध्यमातून वारंवार केला आहे. प्रत्यक्षात त्याने कधीही पुरावा दिला नाही. या प्रकरणात आम्हा हिंदुत्ववादी संघटनांना खूप त्रास झाला असे सांगितले.