Breking News
बार्टी संशोधक विद्यार्थ्यांचा लढा तीव्र; राहुल डंबाळे यांचे उद्यापासून उपोषणप्रेम प्रकरणातून संगणक अभियंता तरुणीची आत्महत्याडीजे-लेझरला फाटा देत आरोग्यदायी गणेशोत्सव साजरा करा!सासवड रस्त्यावर पादचाऱ्याचा मृत्यूनामदार करंडकच्या चौथ्या पर्वाची दिमाखदार सांगता; पुढील वर्षी प्रथम पारितोषिक तीन लाख रुपये; सहभागी सोसायट्यांना २५ हजार प्रोत्साहपर देण्याची चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदी

हिंदवी स्वराज्य शपथभूमी श्री क्षेत्र रायरेश्वर येथे विशेष सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन्न

हिंदवी स्वराज्य शपथभूमी श्री क्षेत्र रायरेश्वर येथे विशेष सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन्न

शाहिरी-गायन-वादन सादरीकरणातून स्वराज्य संकल्पनेचा जागर

marathinews24.com

पुणे – महाराष्ट्र शासन, सांस्कृतिक कार्य विभाग व सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या वतीने हिंदवी स्वराज्य शपथभूमी श्री क्षेत्र रायरेश्वर उत्सवानिमित्त आयोजित विशेष सांस्कृतिक कार्यक्रम बुधवार, दि. २५ मार्च २०२६ रोजी सकाळी १०.०० वा. रायरेश्वर मंदिर परिसर, ता. भोर, जि. पुणे येथे उत्साहात संपन्न झाला.

उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या लढ्याला यश; सुधारित ‘शक्ती कायदा’ विधेयक विधानपरिषदेत एकमताने मंजूर – सविस्तर बातमी 

या कार्यक्रमात शाहिरी, गायन व वादन सादरीकरणाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्य स्थापनेच्या प्रेरणादायी इतिहासाचा जागर करण्यात आला. रायरेश्वर ही स्वराज्याची शपथभूमी असल्यामुळे या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाला विशेष ऐतिहासिक व सांस्कृतिक महत्त्व प्राप्त झाले.

कार्यक्रमाद्वारे शिवचरित्र, स्वराज्याची संकल्पना, शौर्य, त्याग आणि राष्ट्रभक्ती या मूल्यांचा प्रभावी संदेश उपस्थितांपर्यंत पोहोचविण्यात आला. कार्यक्रमास शिवभक्त, नागरिक व सांस्कृतिक रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

सदर कार्यक्रम मा. मंत्री ॲड. आशिष शेलार (सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान) यांच्या संकल्पनेतून तसेच सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली, सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी रायरेश्वर ग्रामस्थ संस्था, रायरी ग्रामपंचायत, स्वराज्यभूमी प्रतिष्ठान, गड संवर्धन समिती, गिर्यारोहक संस्थांचे पदाधिकारी, मंदिर समिती सदस्य, मावळे व त्यांचे वंशज तसेच स्थानिक सरपंच, माजी सरपंच व स्थानिक नागरिक यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

रायरेश्वर उत्सवानिमित्त आयोजित या विशेष सांस्कृतिक कार्यक्रमामुळे उपस्थित शिवभक्तांना स्वराज्य संकल्पनेची प्रेरणादायी अनुभूती मिळाली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×