Breking News
आवडते काय आणि येते काय, यातील फरक ओळखा-ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामलेआमदार संजय गायकवाडांविरोधात गुन्ह्याच्या मागणीसाठी रोहित पवारांचा कोथरूड ठाण्यात ठिय्याधर्मादाय आयुक्तांची परवानगी न घेता संस्थेची ५० कोटींची जमीन तारणदिशाहीन नियोजन व एफएसआय’च्या अनिर्बंध अतार्किक मंजुऱ्यां मुळे ‘पुणे वाहतुक कोंडीच्या’ संकटात…!भरती परीक्षा सुधारणांसाठी शनिवारी पुण्यात सल्लामसलतजिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली चाकण एमआयडीसी परिसरातील पायाभूत सुविधा समितीची बैठक संपन्नएमडी विक्रीच्या तयारीतील त्रिकुटाला बेड्यागणेश विसर्जन मिरवणुकांमधून तंबाखू व अंमली पदार्थ विरोधी जनजागृती अभियान राबवावे- ज्योती कदमपुण्यातील सराईतांना दणका, २२ जण तडीपारपुण्यात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर दोन सराईत तडीपार

‘आखाड पार्टीत तडीपार गुंडाच्या डोक्यात दगड घातला

पुण्यात दहीहंडीत विनापरवाना लावणी नृत्याचा कार्यक्रम

चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – आखाड पार्टीत वैमनस्यातून तडीपार गुंडाच्या डोक्यात दगड घालण्यात आल्याची घटना लाेणी काळभोर भागात घडली. याप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. मारहाणीनंतर तडीपार गुंडाने कोयता उगारून दहशत माजविल्या प्रकरणी त्याच्याविरुद्ध लोणी काळभोर पोलिसांनी स्वतंत्र गुन्हा दाखल केला.

धर्मप्रसाराच्या आरोपावरुन ब्रिटनमधील धर्मगुरुविरुद्ध गुन्हा – सविस्तर बातमी

पियुष उर्फ युवराज गणेश भिसे (वय २२, रा. लोणी काळभोर) याने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार, चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपींनी केलेल्या मारहाणीत भिसे जखमी झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भिसे हा रिक्षाचालक आहे. त्याच्याविरुद्ध गंभीर गुन्हे दाखल आहेत. तीन महिन्यांपूर्वी त्याला पुणे शहर, जिल्ह्यातून तडीपार करण्याचे आदेश परिमंडळ सहाच्या पोलीस उपायुक्तांनी दिले होते. शहरातून तडीपार केल्यानंतर भिसे हा नांदेड परिसरात राहत होता. ७ ऑगस्ट रोजी त्याच्या आईने संपर्क साधला. तब्येत बरी नसल्याचे तिने सांगितले. तेव्हा भिसे हा आईला भेटण्यासाठी लोणी काळभोर परिसरात आला. रविवारी (९ ऑगस्ट) भिसेच्या मामाने त्याला आखाड पार्टीचे निमंत्रण दिले. सकाळी तो लोणी काळभोर परिसरातील मंदिराच्या परिसरातील मोकळ्या जागेत गेला.

तेथील एका शेडमध्ये आखाड पार्टीनिमित्त जेवण तयार करण्याचे काम सुरू होते. भिसे मामाला जेवण तयार करण्यासाठी मदत करत होता. त्या वेळी चैाघे आरोपी तेथे आले. वैमनस्यातून आरोपींनी त्याला शिवीगाळ केली. त्याच्या डोक्यात दगड घातला. भिसे याला सोडविण्यासाठी आलेल्या बाळा भांड याला आरोपींनी मारहाण केली. घटनेची माहिती मिळताच लोणी काळभोर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तडीपार केल्यानंतर आदेशाचा भंग केल्या प्रकरणी भिसे याला पकडले. त्याच्याकडून कोयता जप्त करण्यात आला. जखमी अवस्थेतील भिसे याने कोयता उगारुन दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. पोलीस हवालदार शिंदे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×