पर्वती परिसरात तरुणाला चाकूच्या धाकाने लुटले

पर्वती परिसरात तरुणाला चाकूच्या धाकाने लुटले

पर्वती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – तरुणाला मारहाण करुन चाकूच्या धाकाने लुटण्यात आल्याची घटना पर्वती परिसरात घडली. याप्रकरणी प्रमोद कळंबे (रा. जनता वसाहत, पर्वती पायथा) याच्यासह साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत विशाल भगवान इंगळे (वय २६, रा. अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी) याने पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

गॅस देयकाच्या नावाखाली महिलेची अडीच लाखांची फसवणूक – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कळंबे हा शनिवारी (६ जून) रात्री साडेआठच्या सुमारास पर्वती परिसरातील वेताळबाबा मंदिराजवळ थांबला होता. त्या वेळी आरोपी आणि साथीदार तेथे आले. आरोपींनी त्याला शिवीगाळ करुन मारहाण केली. त्याला चाकूचा धाक दाखवून सोनसाखळी, तसेच रोकड असा ४१ हजार रुपयांचा ऐवज लुटण्यात आला. पसार झालेल्या आरोपींचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत असून, पोलीस उपनिरीक्षक किरण पवार तपास करत आहेत.

अनुदान मिळवून देण्याच्या आमिषाने ४० लाखांची फसवणूक

व्यवसायासाठी शासकीय अनुदान मिळवून देण्याच्या आमिषाने एका महिलेची ४० लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रका उघडकीस आला. या प्रकरणी एका संघटनेच्या अध्यक्षाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. अमोल कृष्णा चव्हाण (रा. अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी) असे गुन्हा दाखल केलेल्याचे नाव आहे. याबाबत एका महिलेने बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ३५ वर्षीय महिला बिबवेवाडी भागात राहायला आहे. आरोपी हा बिबवेवाडी भागात राहायला असून, तो बहुजन क्रांती सेना या संघटनेचा अध्यक्ष आहे. महिला आणि आरोपीची तीन वर्षांपूर्वी ओळख झाली होती. आरोपीने महिलेला व्यवसायासाठी शासकीय अनुदान मिळवून देण्याचे आमिष दाखविले होते. महिलेला आरोपीने बिबवेवाडी भागातील संघटनेच्या कार्यालयात बोलावून घेतले. त्यानंतर अनुदान मिळवून देण्याचे आमिष दाखविले. महिलेकडून गेल्या तीन वर्षात वेळोवेळी ४० लाख रुपये रोख, तसेच ऑनलाइन स्वरुपात घेतले. पैसे घेतल्यानंतर महिलेला कर्ज मिळवून दिले नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने पोलिसांकडे नुकतीच तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक कांबळे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×