Breking News
वानवडीत अतिक्रमणांवर बुलडोझर; अनधिकृत टपऱ्या हटवल्याट्रॅक्टरच्या रोटाव्हेटरमध्ये अडकून गंभीर जखमी झालेल्या तरुणाने सोडला श्वासबीडच्या धर्मापुरीत गांज्याचा साठ्यावर धाडआषाढी पालखी सोहळा-२०२६ वारकऱ्यांसाठी सर्वोत्तम सुविधा उपलब्ध कराव्यातबाणेर रोडवरील पावसाळी पूर्वतयारीचा आढावा; अतिरिक्त महापालिका आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांची संयुक्त पाहणीपीएम कुसुम योजनेअंतर्गत सौर कृषीपंप प्रलंबित आस्थापना व तक्रार निवारण कार्यशाळेस उत्स्फूर्त प्रतिसादआत्महत्येपूर्वी व्हिडिओ बनवत संपवले आयुष्यमुख्यमंत्री बळीराजा शेत, पाणंद रस्ते योजनेअंतर्गत जिल्ह्यात गुणवत्तापूर्ण रस्ते निर्माण करावेतमोटारीची धडक देऊन महिलेला जीवे मारण्याचा प्रयत्नपुण्यात शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने १२ काेटीची फसवणूक

ट्रॅक्टरच्या रोटाव्हेटरमध्ये अडकून गंभीर जखमी झालेल्या तरुणाने सोडला श्वास

ट्रॅक्टरवर चढताना तोल गेला अन् घडला अनर्थ

marathinews24.com

बीड : (अनंत जाधव) – पेरण्या जवळ आल्याने शेतकऱ्यांकडून शेतात कामाला वेग आला असतानाच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मशागतीचे काम सुरू असतानाच ट्रॅक्टरच्या रोटाव्हेटरमध्ये अडकून गंभीर जखमी झालेल्या ३२ वर्षीय तरुणाचे लातूर येथे उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. मंगेश बाबुराव टोपे असे या मयत तरुणाचे नाव असून, तो बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील साळेगाव येथील रहिवासी होता. तब्बल १० दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर त्याची प्राणज्योत मालवली.

बीडच्या धर्मापुरीत गांज्याचा साठ्यावर धाड – सविस्तर बातमी

मिळालेल्या माहितीनुसार, २ जून रोजी मंगेश टोपे हा आपल्या शेतात खरीप हंगामापूर्वीची मशागत करत होता. यादरम्यान ट्रॅक्टरवर चढत असताना अचानक त्याचा तोल गेला आणि तो थेट चालू रोटाव्हेटरमध्ये अडकला. या भीषण अपघातात त्याच्या पोटाला गंभीर दुखापत झाली होती, तसेच पाय फॅक्चर होऊन कानालाही मोठी इजा झाली होती.अपघात झाल्यानंतर मंगेशला तातडीने केज येथील उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी त्याला लातूर येथील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. तिथे गेल्या दहा दिवसांपासून त्याच्यावर उपचार सुरू होते. मात्र, गुरुवारी (११ जून) मध्यरात्री १:३० वाजताच्या सुमारास उपचारादरम्यान त्याने शेवटचा श्वास घेतला आहे.

मंगेश अत्यंत गरीब कुटुंबातील असून तो मनमिळावू स्वभावाचा होता. त्याच्या या अचानक आणि अपघाती जाण्याने साळेगाव व परिसर हळहळत आहे. त्याच्या पश्चात पत्नी, चार आणि दीड वर्ष वयाच्या दोन निष्पाप मुली, तसेच वृद्ध आई-वडील असा मोठा परिवार आहे. घराचा कमावता आधार गेल्याने टोपे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×