Breking News
Caste Validity Certificate Pune : सेवा संकल्प अभियानांतर्गत जात वैधता प्रमाणपत्रासाठी विशेष शिबिरजिल्ह्यातील युवकांनी रोजगार मेळाव्यासह शासकीय योजनांचा लाभ घ्यावाPune Tax Fraud : पुण्यात ४ हजार ४२७ कोटींवर आयकर भरलाच नाहीBARTI Schemes Pune : ‘लोकसंवाद-२०२६’मधून बार्टीच्या योजनांची माहितीनांदेड सिटीतील आरोग्य शिबिरामध्ये ४०० जणांची तपासणीKoyta Case Pune : ऐन गणेशोत्सवात कोयता बाळगला, आरोपीला अटक‘सेवा संकल्प अभियान’च्या माध्यमातून आदिवासी बांधवांपर्यंत योजनांचा थेट लाभ पोहोचविण्याचा संकल्पPune Crime News : अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची १९ लाखांची फसवणूकखरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीतून दागिने चोरीPune Cash Seizure : गणेशोत्सवात एकाकडे ४२ लाखांची रोकड सापडली

अश्लील फोटो व्हायरल करुन तरूणीकडे मागितली २० लाखांची खंडणी

अश्लील फोटो व्हायरल करुन तरूणीकडे मागितली २० लाखांची खंडणी

नराधमाला वारजे माळवाडी पोलिसांनी केले गजाआड

marathinews24.com

पुणे – तरुणीचा पाठलाग करुन तिला २० लाख रुपयांची खंडणी मागितल्याची घटना घडली असून, पैसे न दिल्याने आरोपीने तरुणीचे अश्लील फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले. तिची बदनामी करणार्‍या नराधमाला वारजे माळवाडी पोलिसांनी अटक केली आहे. विजयसिंह संतोष गुंड (वय ३०, रा. मडेवडगाव (ढोकराई) ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी २४ वर्षीय तरुणीने वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार २५ डिसेंबर २०२५ ते २२ मार्च २०२६ दरम्यान सुरु होता.

पुणे जिल्हा सहकारी बँकेत नोकरीच्या आमिषाने फसवणूक – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी आणि विजयसिंह गुंड हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. विजयसिंह हा तरुणीचा पाठलाग करुन तिला त्रास देत होता. त्याने तिच्याकडे २० लाख रुपयांची खंडणी मागितली. पैसे न दिल्याने विजयसिंहने त्याच्यासोबत असलेले तरुणीचे अश्लील फोटो सोशल मीडियावर व्हायरल करुन खल्लास करेन, अशी धमकी दिली. तिच्या इच्छेविरूद्ध तिचा हात धरून स्वत:जवळ ओढले. सुरुवातीला तिने त्याच्या धमकीकडे दुर्लक्ष केले.

पैसे न दिल्याने विजयसिंहने गावाकडील ग्रुपवर तिचे अश्लील फोटो व्हायरल करुन बदनामी केली. ही बाब समजताच तरुणीने वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी विजयसिंह गुंड याच्यावर पाळत ठेवून त्याला ताब्यात घेतले. तरुणीची फिर्याद घेऊन विजयसिंह गुंड याला अटक केली असून, पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेश बोळकोटगी करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×