Breking News
Fake Job Scam : बनावट भरती घोटाळ्यात जेजुरी देवस्थानचा विश्वस्त अटकेतAnjali Malkar Award : हा तर संगीत कलेचा साहित्य दरबारात सन्मान-अंजली मालकरPune Missing Minor Death : पुण्यातील बेपत्ता अल्पवयीन मुलाचा मृतदेह आढळलाNilesh Ghaywal MCOCA Acquittal : कुख्यात गुंड निलेश घायवळसह टोळी निर्दोषPune MLC Election 2026 : महाराष्ट्र विधान परिषदेच्या पुणे विभाग पदवीधर आणि पुणे विभाग शिक्षक मतदार संघाची निवडणूकForeign Language Training Pune : पुणे जिल्हा परिषद-  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा परकीय भाषा शिक्षण उपक्रम पाच भाषांपर्यंत विस्तारलाSuicide Case : प्रेमात फसवणूक झाल्याने विवाहित महिलेची आत्महत्याAccident News : वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील सहप्रवाशाच्या मृत्यूWorld Rabies Day : सेवा संकल्प अभियानांतर्गत जागतिक रेबीज दिन उत्साहातभटक्या-विमुक्त नागरिकांसाठी विशेष हक्क व प्रमाणपत्र अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद

Accident News : वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील सहप्रवाशाच्या मृत्यू

Accident News : वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील सहप्रवाशाच्या मृत्यू

बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – भरधाव वाहनाच्या धडकेत (Accident News) दुचाकीवरील सहप्रवासी तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना जिल्हाधिकारी कार्यालय चौकात घडली. अपघातानंतर पसार झालेल्या वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ओंकार अंकुश जोशी (वय ३४, रा. गणेश काॅम्प्लेक्स, टिंगरेनगर, विश्रांतवाडी) असे मृत्युमुखी पडलेल्या सहप्रवाशाचे नाव आहे. अपघातात दुचाकीस्वार सुहास मच्छिंद्र तपासे (वय ३७, रा. निंबाळकरनगर, डी. वाय. पाटील महाविद्यालय रस्ता, लोहगाव) जखमी झाले. तपासे यांनी याबाबत बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

बारामतीमध्ये दोन महिलांची गळा चिरून हत्या – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार तपासे आणि जोशी हे २६ सप्टेंबर रोजी सकाळी साडेपाचच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालय चौकातून (बोल्हाईमाता मंदिर चौक) मालधक्का चौकाकडे निघाले होते. त्या वेळी भरधाव वाहनाने दुचाकीला पाठीमागून धडक दिली. अपघातात दुचाकीवरील सहप्रवासी जोशी हे गंभीर जखमी झाले. दुचाकीस्वार तपासे यांना दुखापत झाली. अपघातानंतर घटनास्थळी न थांबता वाहन चालक पसार झाला.

Accident News अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जोशी आणि तपासे यांना तातडीने ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच जोशी यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले. पसार झालेल्या वाहन चालकाचा शोध घेण्यात येत असून, पोलिसांनी जिल्हाधिकारी कार्यालय चौक परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले आहे. पोलीस उपनिरीक्षक धुमाळ तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×