Breking News
भारतीय संस्कृती, कलेचा प्रसार जगभर व्हावा- दिग्पाल लांजेकरदिड दिवसाचे गणपती बाप्पांचे विसर्जन; वानवडीत घरामध्ये आगीची घटनागणेश मंडळाच्या माध्यमातून शासकीय योजनांच्या जनजागृतीसाठी लोकसंवाद अभियानराष्ट्रीय लोकअदालतीत पुणे जिल्ह्यात ३७,६८७ प्रकरणांचा सामोपचाराने निपटारापिंपरी-चिंचवडमध्ये १६ ते २९ सप्टेंबरदरम्यान मनाई आदेशभीमाशंकर मंदिर व परिसराच्या आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी करा-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडीपशुधन विमा योजनेसाठी अर्ज मागविण्यास सुरुवात तंत्रज्ञानाला श्रद्धेची जोड; नोबल कास्टमध्ये ॲल्युमिनियमपासून साकारला गणरायाअतिक्रमण विभागातील कर्मचाऱ्यांना धक्काबुक्कीपेन्शन कार्डच्या आमिषाने ज्येष्ठाची २४ लाखांची फसवणूक

ट्रकवर आदळून तरुण जखमी

रिक्षा उलटून प्रवाशाचा मृत्यू; चार जण जखमी

हडपसर-सासवड रस्त्यावर घडली घटना

marathinews24.com

पुणे – रस्त्यात थांबलेल्या ट्रकवर आदळून दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना हडपसर-सासवड रस्त्यावर घडली. याप्रकरणी ट्रक चालकाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला. सिद्धार्थ दत्तात्रय कामठे (वय २३) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वार तरुणाचे नाव आहे. याबाबत कामठे याचा आतेभाऊ दीपक अशोक शिरसाट (वय ३४, रा. शिंदवणे, ता. हवेली, जि. पुणे) याने फुरसुंगी पोलीस टाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुण्यातील अनेकांची बँकखाती पोलिसांच्या रडारवर – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार सिद्धार्थ कामठे हा २१ जुलै रोजी दुपारी तीनच्या सुमारास हडपसर-सासवड रस्त्याने निघाला होता. पालखी विसाव्याजवळ रस्त्याच्या कडेला ट्रक थांबला होता. त्या वेळी दुचाकीस्वार कामठे हा ट्रकवर आदळला. त्याच्या डाेक्याला गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले.

ट्रक चालकाने धोकादायक पद्धतीने ट्रक रस्त्यात थांबविला. बेजबाबदारपणामुळे अपघात घडल्याचे निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. सहायक पोलीस फौजदार फडतरे तपास करत आहेत.

फ्लॅटमधून २ लाख ३० हजार रुपयांचे दागिने चोरीला

पुणे- फ्लॅटच्या गॅलरीतून उतरुन चोरट्यांनी कपाटातील २ लाख ३० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरुन नेल्याची घटना नऱ्हे भागातील एका सोसायटीत घडली. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एकाने नऱ्हे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुण कुटुंबीयांसह नऱ्हे भागातील प्रियल आंगण सोसायटीत राहायला आहे. १२ जुलै रोजी तक्रारदार हे कामानिमित्त बाहेर गेले. त्यांची पत्नी आणि मुलगी कामानिमित्त बाहेर पडले होते. सदनिकेचा दरवाजा बंद होता. चोरट्यांनी सदनिकेतील गॅलरीतून आत प्रवेश केला. शयनगृहातील कपाटात ठेवलेले दोन लाख ३० हजार रुपयांचे दागिने चोरुन चोरटे पसार झाले. दागिने चोरीचा प्रकार नुकताच उघडकीस आला. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक वर्षा देशमुख यांनी घटनास्थळी भेट दिली. पसार झालेल्या चोरट्यांचा शोध घेण्यात येत आहे. पोलिसंनी सोसायटीतील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले असून, पोलीस हवालदार घोलप तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×