Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

शंकरशेठ रोडवर मेफेड्रॉनसह आरोपी जेरबंद

शंकरशेठ रोडवर मेफेड्रॉनसह आरोपी जेरबंद

सव्वा लाखांचा मुद्देमाल जप्त

marathinews24.com

पुणे – शहरात अंमली पदार्थांविरोधातील कारवाया अधिक तीव्र करण्यात आल्या असून, गुन्हे शाखेच्या पथकाने शंकरशेठ रोड परिसरात छापा टाकून मेफेड्रॉन (एमडी) या अंमली पदार्थासह एका आरोपीला ताब्यात घेतले.कारवाईत कार, मोबाइल आणि अंमली पदार्थ असा १ लाख ७६ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी खडक पोलिस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मनीषा हवालदार यांना प्रवासी कोठडी – सविस्तर बातमी 

ही कारवाई २२ मे रोजी सायंकाळी पावणेसहा वाजण्याच्या सुमारास अटल बिहारी वाजपेयी उड्डाण पुलाखाली, मिरा सोसायटी गेट क्रमांक दोनसमोर, शंकरशेठ रोड येथे करण्यात आली. गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी परिसरात सापळा रचला होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कानिफनाथ उर्फ कानु विष्णु नायडु (वय ५१, रा. काशेवाडी, भवानी पेठ) याच्याकडे विक्रीसाठी ठेवलेला ७.२९ मिलीग्रॅम वजनाचा मेफेड्रॉन (एमडी) हा अंमली पदार्थ आढळून आला. जप्त करण्यात आलेल्या एमडीची किंमत १ लाख ४५ हजार ८०० रुपये असल्याचे पोलिसांनी नमूद केले. तसेच आरोपीकडून ३० हजार रुपयांची एक्सेस कार आणि मोबाइल हॅण्डसेटही जप्त करण्यात आला. या प्रकरणात आसिफ पटेल (रा. कामशेत) आणि अकिल शेख (रा. मोहम्मदवाडी, हडपसर) हे आरोपी फरार असून, त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. आरोपींनी विक्रीसाठी दिलेला अंमली पदार्थ ताब्यात घेऊन त्याची विक्री करण्याच्या तयारीत असताना ही कारवाई करण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे.

कारवाईदरम्यान गुन्हे शाखेचे अधिकारी, फॉरेन्सिक मोबाइल व्हॅनचे सहायक रासायनिक विश्लेषक तसेच पोलिस अधिकारी उपस्थित होते. प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक अनिल सुरवसे करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×