Breking News
‘सेवा संकल्प अभियान’च्या माध्यमातून आदिवासी बांधवांपर्यंत योजनांचा थेट लाभ पोहोचविण्याचा संकल्पPune Crime News : अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची १९ लाखांची फसवणूकखरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीतून दागिने चोरीPune Cash Seizure : गणेशोत्सवात एकाकडे ४२ लाखांची रोकड सापडलीPune PG Hostel Action : पुण्यात अनधिकृत पीजी, हॉस्टेल व्यावसायिकांचे धाबे दणाणलेआयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटन

बंडगार्डन पोलीस ठाण्यातून आरोपी झाला पसार

बेडीतून हात सोडवून पहाटे पोलिसांची नजर चुकवत आरोपी फरार; सीसीटीव्हीच्या आधारे शोधमोहीम सुरू

marathinews24.com

पुणे – शहरातील बंडगार्डन पोलीस ठाण्याच्या तपास कक्षातून अटक केलेला आरोपी पसार झाल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला. वैभव अनिल खोत (वय १९, रा. श्रमिकनगर, टिंगरेनगर, विश्रांतवाडी) असे् पसार झालेल्या आरोपीचे नाव आहे. पोलीस ठाण्यातून पसार झाल्या प्रकरणी खोत याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस कर्मचारी शहाजी ठवाळ यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलीस असल्याची बतावणी करुन १ कोटींची रोकड लूटण्याचा प्रयत्न – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खोत याला बंडगार्डन पोलिसांनी एका गुन्ह्यात अटक केली होती. १९ जुलै रोजी त्याला अटक करण्यात आल्यानंतर त्याला तपास पथकाच्या कक्षात ठेवण्यात आले होते. त्याला बेडी घालण्यात आली होती. पहाटे चारच्या सुमारास खोत याने बेडीतून हात अलगदपणे काढून घेतला. तपास पथकातील पोलीस कर्मचाऱ्यांचे लक्ष नसल्याची संधी साधून तो पसार झाला. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. पुणे स्टेशन परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे चित्रीकरण तपासले. पोलीस उपनिरीक्षक गणेश चव्हाण तपास करत आहेत.

टेम्पोच्या धडकेत दुचाकीवरील तरुणाचा मृत्यू – शंकरशेठ रस्त्यावर अपघात

पुणे-टेम्पोच्या धडकेत दुचाकीवरील सहप्रवासी तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना शंकरशेठ रस्त्यावर घडली. याप्रकरणी टेम्पो चालकाविरुद्ध गु्न्हा दाखल केला. जिबाईल झुल्ला खान (वय ४०, मूळ रा. उत्तर प्रदेश) असे मृत्यमुुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. जिबाईल याचे मेहुणे इरफान खान भुलन खान (वय ४३, मूळ रा. उत्तर प्रदेश, सध्या रा.क्वार्टरगेट चौक) याने खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जिबाईल आणि इरफान मूळचे उत्तर प्रदेशातील आहेत. ते मजुरी करतात. १८ जुलै रोजी दुचाकीस्वार इरफान आणि जिबाईल हे शंकरशेठ रस्त्यावरुन निघाले होते. शंकरशेठ रस्ता परिसरातील सेव्हन लव्हज चौक (चिमणराव ढोले पाटील चौक) परिसरात भरधाव टेम्पोने दुचाकीला धडक दिली. दुचाकीवरील सहप्रवासी जिबाईल हा टेम्पोच्या चाकाखाली सापडल्याने तो गंभीर जखमी झाला. अपघातात दुुचाकीस्वार इरफान हा जखमी झाला. अपघातानंतर टेम्पो चालक पसार झाला. अपघातात गंभीर जखमी झालेल्या जिबाईल याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले. सहायक पोलीस निरीक्षक अमोल वळसंग तपस करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×