Breking News
फ्लाईंग जिप्सी कॅफेला दणका, तोपर्यंत बंद ठेवणारपुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे ‘अतिउत्कृष्ट सेवा पदक’हाफकिन संस्थेला गतवैभव मिळवून देण्यासाठी शासन कटिबद्ध – राज्यमंत्री योगेश कदममहा वॉकेथॉन २०२६-वॉक फॉर वॉटर मध्ये नागरिकांनी सहभागी व्हावेसिंहगड रस्ता भागात घरातून बेकायदा मद्य विक्री; आरोपीला अटकडाॅक्टरांकडे १० लाखांची खंडणी मागणाऱ्या तोतया पत्रकारांविरुद्ध गुन्हाजलसंधारण दिनानिमित्त पुणे जिल्ह्यात विविध उपक्रमांचे आयोजनशीघ्र हस्तक्षेपण व शाळापूर्व तयारीसाठी क्रॉस डिसॅबिलिटी अभ्यासक्रम आराखड्याचे लोकार्पणपुणे जिल्ह्यातील जलसंधारण चळवळ : एक दृष्टीक्षेप…!!टेम्पोच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

पुण्यात बुलेट चालकांविरुद्ध कारवाईचा बडगा

बुलेटसह ११ दुचाकी जप्त

marathinews24.com

पुणे – सायलेन्सरमधून फटाक्यासारखा आवाज काढणाऱ्या बुलेट चालकांविरुद्ध हडपसरमधील काळेपडळ पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला. रात्री अपरात्री फटाक्याच्या आवाज काढणाऱ्या बुलेट चालकांच्या त्रासामुळे नागरिक हैराण झाले होते. पोलिसांनी बुलेट, तसेच दुचाकी चालकांविरुद्ध थेट गुन्हे दाखल करुन ११ दुचाकी जप्त केल्या.

कौटुंबिक वादातून तरुणाची इमारतीवरून उडी; अमनोरा सोसायटीत खळबळ – सविस्तर बातमी

काळेपडळ परिसरातील कडनगर चौक, महंमदवाडी, उंड्री, रहेजा व्हिस्टा चौक परिसरात रात्री अपरात्री भरधाव दुचाकी, बुलेट चालक जात असून फटाक्यासारखे आवाज काढण्यात येत असल्याची तक्रार नागरिकांनी पोलिसांकडे केली होती.

सायलेन्सरमधून फटाक्यासारख्या आवाज काढणाऱ्या दुचाकीस्वार, बुलेट चालकांविरुद्ध कारवाई करण्यासाठी विशेष पथक नेमण्यात आले होते. सहायक पोलीस फौजदार राजस शेख, हवालदार प्रवीण काळभोर, महादेव शिंदे, गिरीराज जगदाळे यांनी बुलेट चालक, तसेच दुचाकीस्वारांविरुद्ध कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी बुुलेटसह ११ दुचाकी जप्त केल्या. मोटार वाहन कायदा, सार्वजनिक शांततेता भंग करणे, केंद्रीय मोटार वाहन कायदा कलम १२० अन्वये १८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

परिमंडळ सहाचे पोलीस उपायुक्त जीवन बेनीवाल यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीषा निंबाळकर, गु्न्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अण्णासाहेब बाबर, सहायक निरीक्षक विलास सुतार, राजस शेख, प्रवीण काळभोर, अमोल फडतरे, नीलेश देसाई, दाऊद सय्यद, प्रतीक लाहीगुडे, शाहिद शेख, अतुल पंधरकर, नितीन ढोले, विशाल ठोंबरे यांनी ही कारवाई केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×