शासकीय तांत्रिक विद्यालयात द्विलक्षी अभ्यासक्रमास प्रवेश सुरू

शासकीय तांत्रिक विद्यालयात द्विलक्षी अभ्यासक्रमास प्रवेश सुरू

शासकीय तांत्रिक विद्यालयाचे मुख्याध्यापक एस. एन. पुरी यांचे आवाहन

marathinews24.com

पुणे – घोले रोड येथील शासकीय तांत्रिक विद्यालयात इयत्ता 11 वी द्विलक्षी अभ्यासक्रमाकरिता प्रवेश प्रक्रिया सुरू असून संस्थेशी संलग्न महाविद्यालयात विज्ञान शाखेला प्रवेश घेऊन द्विलक्षी अभ्यासक्रमांची निवड करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

खेळाडूंच्या पाठीमागे राज्यशासन खंबीरपणे उभे- क्रीडा व युवक कल्याणमंत्री दत्तात्रय भरणे – सविस्तर बातमी 

शासकीय तांत्रिक विद्यालयात मेकॅनिकल मेन्टेनन्स आणि इलेक्ट्रिकल मेन्टेनन्सच्या प्रत्येकी 100 जागा, स्कुटर मोटार सायकल सर्व्हिसिंग- 50, इलेक्ट्रॉनिक्स अभ्यासक्रमाच्या 50 जागांचा उपलब्ध आहेत. आबासाहेब गरवारे महाविद्यालय, फर्ग्यूसन महाविद्यालय, मॉडर्न महाविद्यालय, पूना कॉलेज, एस. एम. एन. कनिष्ठ महाविद्यालय, अभिषेक विद्यालय चिंचवड, नूतन मराठी विद्यालय (मुलींचे) या नामांकित विद्यालयात 1 हजार 200 रुपये प्रवेश शुल्क भरुन या अभ्यासक्रमाकरिता प्रवेश घेता येणार आहे.

प्रवेशाबाबत अधिक माहितीकरीता 9822109175, 9527433345, 8975789455, 9822331775, 9922443626 या भ्रमणध्वनी क्रमांकांवर संपर्क साधून अधिकाधिक विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा, असे आवाहन शासकीय तांत्रिक विद्यालयाचे मुख्याध्यापक एस. एन. पुरी यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये केले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×