Breking News
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त वाहतुकीत बदलसाहित्यरत्न लोकशातिर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीच्या पूर्वसध्येला समाजरत्न पुरस्कार समारंभपुण्यात १२ हजार ७५० विद्यार्थ्यांना मिळणार ‘अंकनाद गणित सात्मीकरण प्रणालीबालमैत्रीपूर्ण आश्रमशाळा उपक्रम आदिवासी मुलांसाठी संरक्षणात्मक वातावरण करण्यास उपयुक्त-प्रदीप देसाईखराडी पार्टी प्रकरणात पोलिसांची कारवाई एकतर्फीछत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना; यवतमध्ये ३१ जुलैला रस्ता रोकोॠषिकेश ते रामेश्वरम गौ राष्ट्र यात्रेचे पुण्यात उत्साहात स्वागतसैनिक व त्यांच्या कुटुंबांच्या सन्मानासाठी विधी सेवा चिकित्सालय केंद्राचे ठोस पाऊल – आयुक्त पुलकुंडवारजिल्ह्यातील वनपर्यटनात मोठ्या क्षमता; पर्यावरणपूरक पद्धतीने पर्यटकांसाठी सुविधा निर्माण कराव्यातलायन्स क्लब पूना शिवाजीनगरच्या अध्यक्षपदी डॉ. गणेश खामगळ यांची निवड

अहमदाबाद विमान दुर्घटना क्लेशदायक -उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजली

अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या एअर इंडिया विमानाचा अपघात

marathinews24.com

मुंबई – गुजरातच्या अहमदाबाद विमानतळावरुन लंडनला निघालेलं एअर इंडियाचं विमान अहमदाबाद शहरातील इमारतींवर कोसळून झालेल्या अपघातात प्रवासी तसेच स्थानिक नागरिकांचा झालेला मृत्यू धक्कादायक, क्लेशदायक, दुर्दैवी घटना असल्याचे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अपघाताबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले आहे.

अपघातांना जबाबदार असलेली अवजड वाहने जप्त करणार- पोलीस आयुक्तांचा इशारा – सविस्तर बातमी

अहमदाबाद शहरातील या विमान अपघातामुळे महाराष्ट्रासह संपूर्ण देश आज दु:खी असून मृत्यू पावलेल्यांच्या कुटुंबियांच्या दु:खात प्रत्येक महाराष्ट्रवासी सहभागी असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शोकसंदेशात म्हणाले, अहमदाबादहून लंडनला जाणारं एअरइंडियाचं विमान उड्डाणानंतर थोड्याच वेळेत अहमदाबाद शहरातील इमारतींवर कोसळलं. ती संपूर्ण दुर्घटना धक्कादायक, क्लेशदायक होती. गुजरात पोलिस, अग्निशमन, ॲम्बुलन्स सेवा, वैद्यकीय पथकांनी, सुरक्षादलांनी दुर्घटनास्थळी पोहचून तातडीने बचाव व मदतकार्य तातडीने राबवलं. परंतु झालेली जिवितहानी खुप मोठी असून ती भरुन निघणार नाही. अपघाताचं निश्चित कारण अद्याप कळलं नसलं तरी चौकशीअंती ते स्पष्ट होईल. परंतु अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी पावलं उचलण्याची गरज आहे.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांनींही विमान दुर्घटनेची गंभीर दखल घेतली आहे. गुजरातच्या मुख्यमंत्र्यांकडून अपघाताची संपूर्ण माहिती घेऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना गुजरातला पाठवले. या दुर्घटनेच्या निमित्तानं विमानसेवेच्या सुरक्षिततेकडे अधिक गांभीर्यानं लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. विमानसेवा कंपन्यांनी त्यांच्या विमानसेवेच्या सुरक्षेचा फेरआढावा घेऊन, सुरक्षितता मानकांचे पालन करुन भविष्यात अशी दुर्घटना होणार नाही, हे सुनिश्चित करावे, असे आवाहनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे. दरम्यान, अकोला, बुलडाणा दौऱ्यावर असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपले कार्यक्रम साध्या पद्धतीने घेत दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या प्रवाशांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top