Breking News
Market Yard Ganeshotsav : भाजीपाला, फळे अन् कंदमुळांतून साकारली गणरायाची अनोखी आरासLokSamvad 2026 : रक्तदान केल्याने गरजू रुग्णाला जीवदान तर रक्तदान दात्याच्या आरोग्यालाही अनेक फायदे – डॉ. विद्या राठोडBibwewadi Crime : कार मागे घेण्यास सांगितल्याच्या वादातून तरुणावर हल्ला‘Bappa.org’ च्या माध्यमातून पुणे जिल्ह्यातील गणेशोत्सवाच्या परंपरा जगासमोर आणाMundhwa Drug Smuggler : अमली पदार्थ तस्कर महिला वर्षभरासाठी कारागृहात स्थानबद्धPune Crime News : श्वान मालक महिलेच्या अंगावर मोटार घालून खुनाचा प्रयत्नUrban Poor Health Scheme : लोकसंवाद-२०२६’मधून महापालिकेच्या आरोग्य योजनांची जनजागृतीSadashiv Peth Dog Death : मारहाण केल्याने श्वानाचा मृत्यूKondhwa Cash Recovery : पोलिसांच्या प्रयत्नांमुळे व्यापाऱ्याची अडीच लाखांची रोकड सापडलीSports Schemes Pune : क्रीडा विभागाच्या विविध योजनांचा युवकांनी लाभ घ्यावा; राज्यात अनेक क्रीडापटू घडवू या

हवाई दलातील तोतया जवानाला पकडले

मोटारचालक डाॅक्टरांना मारहाण; टोळक्याविरुद्ध गुन्हा

बनावट ओळखपत्र, गणवेश जप्त

marathinews24.com

पुणे – हवाई दलातील जवानासारखा गणवेश परिधान करुन वावरणाऱ्या एकाला पकडले. त्याच्याविरुद्ध लोहगाव पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या तरुणाकडून हवाई दलातील बनावट ओळखपत्र आणि गणवेश जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी शुभम विलास अंबुरे (वय २६, सध्या रा. स्वप्ननगरी सोसायटी, शिक्रापूर रस्ता, ता. शिरुर, जि. पुणे) याला अटक करण्यात आली आहे. हवाई दलातील जवान ब्रिजेशकुमार मिश्रा (वय ४८) यांनी लोहगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

सराईत चौघे पुणे जिल्ह्यातून तडीपार; वाघोली पोलिसांची कारवाई – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंबुरेने लोहगावमधील गुरुद्वारा रस्त्यावरील एका टेलरिंग दुकानातून हवाई दलातील जवानासारखा गणवेश शिवून घेतला होता. त्याने हवाई दलातील जवानाचे बनावट ओळखपत्र तयार करुन घेतले. बनावट ओळखपत्र बाळगून, तसेच हवाई दलातील जवानासारखा गणवेश परिधान करुन तो वावरत होता. याबाबत हवाई दलातील अधिकाऱ्यांना मिळाली. त्यानंतर सापळा लावून त्याला पकडण्यात आले. अंबुरेला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

अंबुरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करुन त्याला अटक करण्यात आली आहे. त्याने हवाई दलातील जवानासारखा गणवेश का परिधान केला, तसेच त्याने ओळखपत्र कसे तयार केले ? यादृष्टीने पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीषा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक शिंंदे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×