Breking News
Women Scientists Felicitation Pune : श्री महालक्ष्मी मंदिरातर्फे महिला शास्त्रज्ञांचा सन्मानMaharashtra Drought Relief Measures 2026 : बंद पाणीपुरवठा योजना तातडीने सुरू करा; टँकरचा पर्याय शेवटी वापरा–महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेAnubandh Support Group Pune : एकटेपणावर मात करण्यासाठी अनुबंधसारखे आधारगट हवे- विजया रहाटकरDagdusheth Ganpati Trust : ‘दगडूशेठ’ गणपती ट्र्स्ट तर्फे ५०० ज्येष्ठांना मोफत श्रवणयंत्रPolice Constable Suspension : इन्स्टाग्रामवरील बातमीवर आक्षेपार्ह टिप्पणी भोवलीPune Crime News : तडीपारीचा आदेश धुडकावून आरोपी महिला शहरात आल्याPune Mobile Theft Case : मोबाईल चोरणारा २४ तासांत जेरबंद; लक्ष्मीनगर पोलिसांची कारवाईMaharashtra Education News : दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क घेऊ नका; घेतले असल्यास परत कराPune Fertilizer License Suspended : रब्बी हंगामात खत विक्रीतील अनियमिततेप्रकरणी जिल्ह्यात चार वितरकांचे परवाने निलंबितDharau Marathi Movie 2026 : ‘धाराऊ… ती गाय नाय… माय हाय मायेच्या अतूट नात्याची भावस्पर्शी गोष्ट २३ ऑक्टोबरपासून चित्रपटगृहांत

पुण्यात ऐरोस्पेस मॉलमधील बारमध्ये रात्रभर डांगडिंग

गुन्हे शाखेने टाकला छापा, ८ जणांना अटक

marathinews24.com

पुणे – शहरातील मध्यवर्ती विमाननगर परिसरातील ऐरोस्पेस मॉलमध्ये रात्रभर सुरू असलेल्या तरूणाईच्या धांगडधिंगाण्याला पोलिसांनी वेसन घातली आहे. द हाउस कम्युनी बार अ‍ॅड इटरी बारवर गुन्हे शाखेने छापा टाकून कारवाई केली. याप्रकरणी ८ जणांना अटक करण्यात आली असून, १ लाख ६७ हजारांचा मद्यसाठा आणि ७५ हजारांची साउंड प्रणाली जप्त करण्यात आली आहे.

दिवंगत उद्योगपती रतन टाटांच्या नावे ‘डीपफेक व्हिडीओ’ – सविस्तर बातमी

सुमित रोहिदास गोटे (वय ३० रा. येरवडा ) नूर हुसेन शेख (वय ३० रा. विमाननगर) सोनाली विलास पंडित (वय ३२ रा. उंड्री ) मंगेश उत्तम धिमधीमे (रा. धानोरी) अनिकेत निवृत्ती मांडकीकीर (वय २१ रा.धानोरी) सुनीता जैन वर्मा (वय २५ रा. लोहगाव) अनंत जगल गायकवाड (वय ३१ रा. खडकी पुणे) शाहनूर अमीनुद्दीन काझी (वय ३५ रा. बिबवेवाडी ओटा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. ऐरोस्पेस मॉलमधील द हाउस कम्युनी बार अ‍ॅड इटरी बारमध्ये नियमांचे उल्लंघन करीत रात्रभर तरूणाईला मद्यविक्री केली जात असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली. त्यानुसार ९ ऑगस्टला पहाटे साडेतीनच्या सुमारास पथकाने छापा टाकला.

बारमध्ये ८९ जण त्याठिकाणी आढळून आले. त्यामध्ये ६३ पुरुष व २६ महिलांचा समावेश असून, बहुतांश जणांनी मद्यपान केले होते. तसेच रात्री दीड वाजेनंतर आस्थापना बंद करण्याचे आदेश असतानाही संबंधित बार व्यावसायिकाने निमयांचे उल्लंघन केले. नियमबाह्य पद्धतीने दारूची विक्री केल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यानुसार याप्रकरणी ८ जणांना अटक केली आहे. तसेच दारूसाठा, डिजे सिस्टीम जप्त केली आहे. ही कामगिरी पोलीस उपायुक्त गौहर हसन, एसीपी शंकर खटके पोलीस निरीक्षक अविनाश माने, पोलीस निरीक्षक जीवन माने, पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे, उपनिरीक्षक पवार, जाधव, चौगुले, सरगर, चव्हाण, मंडलिक, नेवसे, तारु, तुपसुंदर, शिंदे, राठोड, खराडे, साबळे, केगले, रणपिसे, रेणुसे, राठोड, बांदल, शेलार यांनी केली.

शहरात नियमबाह्य पद्धतीने रात्री उशिरापर्यंत आस्थापना सुरू ठेवणार्‍याविरूद्ध कारवाई केली जात आहे. संबंधितांनी नियमांचे पालन करावे, अन्यथा कारवाईचा बडगा उगारला जाईल.

गौहर हसन, पोलीस उपायुक्त, गुन्हे शाखा

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×