Breking News
कसबा पेठेतील राधेकृष्ण ग्रुपने फोडली सुवर्णयुग तरुण मंडळाची दहीहंडीपुणेकरांनी अनुभवला पुनीत बालन ग्रुपच्या संयुक्त डीजेमुक्त दहीहंडीचा थरारश्रीकृष्ण जन्माष्टमीचा जल्लोष! हर्षवर्धन फाउंडेशनच्या दहीहंडी उत्सवात कलाकारांची मांदियाळीशेतकरीहितासाठी आधुनिक तंत्रज्ञान व मूल्यवर्धित उत्पादनांवर भर द्यावा -उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवारराज्यस्तरीय भरती परीक्षांच्या पद्धतीचा सर्वंकष आढावा घेण्यासाठी उच्चस्तरीय समितीसणांच्या माध्यमातून सामाजिक वारसा जपावा – महापौरसणांच्या माध्यमातून सामाजिक वारसा जपावा; महापौर मंजूषा नागपुरेमहिला पोलिसांसाठी स्वतंत्र समुपदेशन व मदत यंत्रणा उभारावी : डॉ. नीलम गोऱ्हेआदर्श शिक्षक व गुणवंत विद्यार्थ्यांचा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते सन्मान१४ वर्षांनंतर शिक्षक पुरस्काराची परंपरा पुन्हा सुरू; ४२ शिक्षकांचा सन्मान

मान्सून काळात बांधकाम कामगारांची काळजी घेण्याचे आवाहन

मान्सून काळात बांधकाम कामगारांची काळजी घेण्याचे आवाहन

सुरक्षा विषयक सर्व साहित्य, साधने उपलब्ध करुन द्यावीत, कुटूंबियाची सुरक्षीत ठिकाणी राहण्याची सोय करण्याचे आवाहन 

marathinews24.com

पुणेसर्व बांधकाम आस्थापना मालकांनी मुसळधार पावसाने व वादळी वाऱ्याने बांधकामाच्या ठिकाणी कोणतीही दुर्घटना किंवा अपघात होणार नाही, त्यांना सुरक्षा विषयक सर्व साहित्य, साधने उपलब्ध करुन द्यावीत, त्यांचे व त्यांच्या कुटूंबियाची सुरक्षीत ठिकाणी राहण्याची सोय करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

‘हिंदी भाषेची सक्ती बिनडोक व कर्मदरिद्री’ ज्येष्ठ साहित्यिक व मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांचा घणाघात – सविस्तर बातमी 

इमारत व इतर बांधकाम कामगार (रोजगार व नियमन व सेवाशर्ती) अधिनियम, १९९६ अंतर्गत आपले आस्थापनेत कार्यरत बांधकाम कामगार यांच्या आरोग्य व सुरक्षा विषयक तरतुदीची प्रभावी अंमलबजावणी करावी. बांधकाम व्यावसायिकांनी सुरक्षा परिक्षण (सेफ्टी ऑडीट) पूर्ण करुन घ्यावे. सुरक्षा अधिकाऱ्यांची नेमणूक करुन त्याला सतर्क राहाण्याच्या सूचना देण्यात याव्यात.

प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष कामगार, कर्मचारी एकुण १० पेक्षा अधिक असणाऱ्या प्रत्येक बांधकाम व्यावसायिकांनी अधिनियमाअंतर्गत मालक, नियोक्ता म्हणून नोंदीत होणे कायद्याने बंधनकारक आहे. ज्या आस्थापनांनी अद्यापी नोंदणी केली नसल्यास ऑनलाईन https://lms.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करावी. तसेच बांधकाम कामगारांची नोंदणी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात ऑनलाईन पध्दतीने https://mahabocw.in या संकेतस्थळावर करवून घ्यावी. नोंदीत बांधकाम कामगारांनाच कामावर नेमावे. अनोंदीत कामगारांची प्राधान्याने नोंदणी केल्याची व्यक्तीशः खात्री करावी.

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत बांधकाम कामगारांसाठी कल्याणकारी योजना राबविल्या जातात, या योजनांचे लाभ बांधकाम कामगारांना मिळण्याच्यादृष्टीने त्यांना सहकार्य करावे, याबाबत अधिक माहितीकरिता अपर कामगार आयुक्त, पुणे यांचे कार्यालय, शक्ती चेंबर्स, स. नं. ७७/१, ४ था मजला, संगमवाडी, पुणे-३ या कार्यालयाशी कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असे आवाहन पुणे विभागाचे अपर कामगार आयुक्त बाळासाहेब वाघ यांनी केले आहे.

व्हिडीओ

error: Content is protected !!
Scroll to Top
×