Breking News
MLC Election 2026 : विधान परिषदेच्या ५ पदवीधर व शिक्षक मतदारसंघांसाठी २३ ऑक्टोबरला मतदानBaramati Wastewater Reuse : बारामतीत सांडपाण्यावर प्रक्रिया केलेल्या पाण्याचा पुनर्वापरPune News : पुण्यात २२ ऑक्टोबरला ‘सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज’चे जनजागृती सत्रPune Assault Cases : महिला पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण; कोरेगाव पार्कमधील घटनाPune Post Office : टपाल विभागाच्यावतीने २७ ऑक्टोबरला पेन्शन अदालतीचे आयोजनYerawada Drainage Pit Death Case : येरवड्यात खड्ड्यात पडून ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यूPune Fodder Production Plan : पुणे जिल्ह्यात २५ हजार एकरांवर चारा उत्पादनाचे नियोजनPune Police : पुण्यातील १० गुन्हेगारांना तडीपारीचा दणकाPune Water Scarcity Action Plan : संभाव्य पाणीटंचाई निवारणासाठी त्रैमासिक कृती आराखडा तातडीने सादर करा – अमित पाथरवटPune Cyber Crime : पेन्शनकार्ड नोंदणीची बतावणी, जेष्ठाला ५ लाखांचा गंडा

पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याच्या मंजूरीमुळे वाहतूक सुधारण्यास मदत -उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याच्या मंजूरीमुळे वाहतूक सुधारण्यास मदत -उपमुख्यमंत्री अजित पवार

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला पुण्यासह राज्यातील विकासकामांचा आढावा

marathinews24.com

मुंबई – पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या टप्पा दोन अंतर्गत, 1) वनाज ते चांदणी चौक (मार्गिका 2 अ) आणि 2) रामवाडी ते वाघोली-विठ्ठलवाडी (मार्गिका 2 ब) या दोन कामांना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने आज मान्यता दिल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्रिमंडळातील सदस्यांचे आभार मानले आहेत.

आणीबाणी लागू झाल्याच्या घटनेला 50 वर्षपूर्ण झाल्याबद्दल; आयोजित प्रदर्शनाचे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते उद्घाटन – सविस्तर बातमी 

केंद्रीय मंत्रिमंडळाचा हा निर्णय पुण्याची वाहतूककोंडी सोडवण्यात, सार्वजनिक वाहतुकव्यवस्था सुधारण्यात, पुणे व परिसराच्या आर्थिक, औद्योगिक, व्यापारी, शैक्षणिक विकासात महत्वाची भूमिका बजावेल, असा विश्वासही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार हे त्यांच्या कार्यालयातील ‘प्रोजेक्ट मॉनिटरींग युनीट’च्या (पीएमयु) माध्यमातून पुण्यातील विकासप्रकल्पांसंदर्भात सातत्याने बैठका, आढावा घेऊन पुणे मेट्रोच्या विस्तारीत कामांना मंजूरी मिळावी म्हणून प्रयत्नशील होते. त्यांच्या प्रयत्नांना आज यश आले आहे. पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात वणाज ते रामवाडी मार्गिकेचे काम हाती घेण्यात आले.

पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याच्या मंजूरीमुळे वाहतूक सुधारण्यास मदत -उपमुख्यमंत्री अजित पवार

आज मंजूरी मिळालेल्या दुसऱ्या टप्प्यात 1) वनाज ते चांदणी चौक (मार्गिका 2 अ) आणि 2) रामवाडी ते वाघोली-विठ्ठलवाडी (मार्गिका 2 ब) ही दोन कामे मार्गी पूर्ण करण्यात येणार आहेत. या दोन्ही मार्गिका उन्नत आणि 12.75 किलोमीटर लांबीच्या आहेत. या मार्गिकांवर 13 स्थानके असणार आहेत. या सेवेचा उपयोग प्रामुख्याने चांदणी चौक, बावधन, कोथरुड, खराडी, वाघोली उपनगरातील प्रवाशांना होणार आहे. पुण्यातील आयटी, व्यापारी, औद्योगिक विकासासाठीही हा प्रकल्प महत्वाचा ठरणार आहे. यासाठी 3 हजार 626 कोटी 24 लाख रुपये (रु.3626.74) खर्च येणार असून येत्या चार वर्षात हा प्रकल्प पूर्ण होईल, असे नियोजन आहे.

उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पुणे शहर आणि जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासावर लक्ष केंद्रीत केले आहे. त्यांच्या कार्यालयातील प्रोजेक्ट मॉनिटरींग युनीट’च्या (पीएमयु) माध्यमातून ते संबंधित अधिकाऱ्यांच्या नियमित बैठका घेऊन प्रकल्पातील अडथळे दूर करण्याचा आणि कामांना गती देण्याचा सातत्याने प्रयत्न करत असतात. आजही (ता.25) त्यांनी ‘पीएमयु’ची बैठक घेऊन पुण्यासह राज्यातील महत्वाच्या विकासकामांचा आढावा घेतला. पुण्यासह मंत्रालयातील सर्व संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×