Breking News
‘सेवा संकल्प अभियान’च्या माध्यमातून आदिवासी बांधवांपर्यंत योजनांचा थेट लाभ पोहोचविण्याचा संकल्पPune Crime News : अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची १९ लाखांची फसवणूकखरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीतून दागिने चोरीPune Cash Seizure : गणेशोत्सवात एकाकडे ४२ लाखांची रोकड सापडलीPune PG Hostel Action : पुण्यात अनधिकृत पीजी, हॉस्टेल व्यावसायिकांचे धाबे दणाणलेआयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटन

वास्तुरचनाकारांनी नवतंत्रज्ञानासह प्रयोगशील व सर्जनशील वृत्ती अंगीकारावी

Architecture Exhibition Pune

आर्कि. अजय सोनार यांचे प्रतिपादन; ‘एसएमईएफ’तर्फे आयोजित ‘ब्रिक १२ ऑन १२’ प्रदर्शनातून वास्तुकलेतील नवकल्पनांना चालना

marathinews24.com

पुणे – “बदलत्या काळातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी भावी वास्तुरचनाकारांनी नवतंत्रज्ञानाची सांगड सर्जनशीलता, संशोधन आणि प्रयोगशीलतेशी घालणे आवश्यक आहे. समाजाभिमुख, पर्यावरणपूरक आणि शाश्वत वास्तुरचना हीच काळाची गरज असून, विद्यार्थ्यांनी केवळ इमारतींची रचना न करता लोकांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडविणारी दृष्टी विकसित करावी,” असे प्रतिपादन प्रसिद्ध वास्तुविशारद तथा ‘ए फॉर आर्किटेक्चर’चे सहसंस्थापक आर्कि. अजय सोनार यांनी केले.

पायाभूत सुविधांच्या विकासामुळे २०३० पर्यंत पुणे देशाचे ‘ग्रोथ इंजिन’ बनणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – सविस्तर बातमी 

सतीश मिसाळ एज्युकेशनल फाउंडेशनच्या ब्रिक ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सतर्फे आयोजित ‘ब्रिक १२ ऑन १२’ या प्रदर्शनावेळी सोनार यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. उपक्रमाचे हे आठवे वर्ष होते. आघारकर रस्त्यावरील सारथी संस्थेच्या सभागृहात आयोजित या दोन दिवसीय उपक्रमात १२ निवडक विद्यार्थ्यांनी प्रत्येकी १२ मिनिटांत आपल्या वास्तुकलेशी संबंधित संशोधन, संकल्पना आणि डिझाइन सादर केले. यासोबतच वार्षिक प्रदर्शन, माजी विद्यार्थ्यांचा मेळावा, तज्ज्ञांची व्याख्याने आणि परिसंवादाचे आयोजन करण्यात आले.

या उपक्रमात विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध डिझाइन संकल्पना, संशोधन प्रकल्प आणि नाविन्यपूर्ण कल्पनांचे प्रदर्शन उपस्थितांनी पाहिले. वास्तुकला क्षेत्रातील तज्ज्ञ, माजी विद्यार्थी आणि प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत करिअरच्या संधी, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योगातील बदलत्या अपेक्षांविषयी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला, संशोधनवृत्तीला आणि व्यावसायिक तयारीला चालना देणारा हा उपक्रम उत्साहात पार पडला.

या कार्यक्रमावेळी प्रख्यात वास्तुरचनाकार आर्कि. राजीव विश्वासराव, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. रावसाहेब लटपटे, संस्थेच्या संस्थापक संचालिका डॉ. पूजा मिसाळ, प्राचार्या डॉ. पूर्वा केसकर, उपप्राचार्या आर्कि. मनाली देशमुख, आर्कि. अभंग कांबळे, आर्कि. नलिनी निंबाळकर, आर्कि. मयुरेश शिरोळकर, डॉ. वैदेही लवांड, डॉ. श्रद्धा माहोरे-मांजरेकर, डॉ. सुधीर देशपांडे, आर्कि. अक्षय गांधी, आर्कि. इरावती नाथ यांच्यासह वास्तुरचना क्षेत्रातील मान्यवर, विद्यार्थी व पालक उपस्थित होते.

आर्कि. राजीव विश्वासराव यांनी विद्यार्थ्यांना व्यावसायिक जगातील अनुभव सांगत वास्तुकलेत तांत्रिक कौशल्याबरोबरच सामाजिक जबाबदारी, स्थानिक गरजांची जाण आणि सातत्याने शिकण्याची वृत्ती महत्त्वाची असल्याचे सांगितले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. रावसाहेब लटपटे यांनी संशोधनाधारित शिक्षण, नवतंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आणि बहुआयामी विचारसरणी यांचा अंगीकार करण्याचे आवाहन केले. ‘बियॉंड डिझाईन: द स्ट्रॅटेजी बिहाइंड सक्सेसफुल प्रोजेक्ट्स’ या विषयावरील चर्चासत्रात आर्कि. विजय साने, आर्कि. अदिती वाटवे, आर्कि. रोहित सरदेसाई, आर्कि. कनिका अग्रवाल यांनी विचार मांडले.

संस्थेच्या संस्थापक संचालिका डॉ. पूजा मिसाळ यांनी विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावरील तज्ज्ञांसमोर आपले विचार मांडण्याची संधी उपलब्ध करून देणे, त्यांचा आत्मविश्वास वाढविणे आणि व्यावसायिक जगासाठी सक्षम बनविणे हा ‘ब्रिक १२ ऑन १२’ उपक्रमाचा उद्देश असल्याचे सांगितले. डॉ. पूर्वा केसकर यांनी अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये सादरीकरण कौशल्य, संशोधनवृत्ती आणि व्यावसायिक दृष्टी विकसित होत असल्याचे नमूद केले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×