Breking News
राज्य शासनाचा शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा निर्धार – विशेष लेखमहाकर्जमुक्ती योजनेतील लाभार्थी शेतकऱ्यांना दिलासा, लाभ मिळेपर्यंत व्याज आकारू नयेतखाजगी कृत्रिम रेतन तंत्रज्ञांना विविध सेवांसाठी प्रोत्साहनपर अनुदान लागूनाविण्यपूर्ण उपक्रमांद्वारे जादूटोणा विरोधी कायद्याची प्रचार, प्रसिद्धी कराविषमुक्त अन्नासाठी सेंद्रिय शेतीचा अवलंब गरजेचा- सभापती किरण तावरेविकसित भारत-रोजगार व आजिविका हमी अभियान (ग्रामीण) योजनेचा जिल्हास्तरीय शुभारंभराज्यस्तरीय कृषी पुरस्कार वितरण समारंभात तालुक्यातील तीन शेतकऱ्यांचा सन्मान-सचिन हाकेकेंद्राच्या शाळांनाही नियमांचे बंधन हवे-डॉ. नीलम गोऱ्हेपुरावा मिळू नये म्हणून बॉयफ्रेंड-गर्लफ्रेंडने रचला कट‘राष्ट्रप्रथम’ ही भावना छत्रपती शिवाजी महाराजांनी सामान्यांच्या मनात रुजवली-पांडुरंग बलकवडे

गांजा तस्कराचा आरोप, लुटमार करणार्‍यांना अटक

गांजा तस्कराचा आरोप, लुटमार करणार्‍यांना अटक

पर्वती पोलिसांची कामगिरी

marathinews24.com

पुणे – तू गांजा विकायला इथे आला आहेस, पोलिसांना फोन करून माहिती देतो, तुला वाचायचे असल्यास ५० हजार रूपये दे असे म्हणत तरूणाची लुटमार करणार्‍या दोघांना पर्वती पोलिसांनी अटक केली आहे. प्रमोद अंकुश कळंबे (वय २० रा. पर्वती दर्शन) बसवराज उर्फ अभिषेक राजेंद्र पाटील (वय २० रा. जनता वसाहत, सध्या कात्रज खोपडे ) नगर अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

देशी बनावटीचे पिस्तूल बाळगणारा गुंड गजाआड – सविस्तर बातमी  

पर्वती पायथा परिसरात टोळक्याने तरूणाला ६ जूनला अडवून चाकूचा धाक दाखवला. गांजा तस्कर असल्याचा आरोप करीत ५० हजारांची मागणी टोळक्याने केली. त्याच्याकडून ३ हजारांची रोकड, सोन्याची बाळी, २१ हजार रूपये गुगल पेद्वारे ऑनलाईनरित्या घेतले. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच पर्वती पोलिसांनी तपासाला गती दिली. तपास अधिकारी किरण पवार हे तपास करीत असताना पोलीस अमलदार अमोल दबडे, अमित चिव्हे यांना गुन्ह्यातील आरोपींची माहिती मिळाली.

पथकाने प्रमोद कळंबे आणि बसवराज पाटील याला ताब्यात घेतले. त्यांच्याकडून गुन्ह्यातील ऐवज जप्त केला आहे. ही कामगिरी अपर आयुक्त राजेश बनसोडे, उपायुक्त मिलींद मोहिते, एसीपी धन्यकुमार गोडसे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र सहाणे, उपनिरीक्षक किरण पवार, प्रकाश मरगजे, महेश मंडलिक, राकेश सुर्वे, स्वप्निल घुगे, नानासो खाडे, मनोज बनसोड, सद्दाम शेख, सूर्या जाधव यांनी केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×