Breking News
Pune Crime News : अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची १९ लाखांची फसवणूकखरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीतून दागिने चोरीPune Cash Seizure : गणेशोत्सवात एकाकडे ४२ लाखांची रोकड सापडलीPune PG Hostel Action : पुण्यात अनधिकृत पीजी, हॉस्टेल व्यावसायिकांचे धाबे दणाणलेआयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रम

Ashadhi War : आषाढी वारी पालखी सोहळ्यानिमित्त काटेवाडी येथे वारकऱ्यांसाठी आरोग्यसेवा

Ashadhi War

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते औषधोपचार किटचे वाटप

marathinews24.com

बारामती – आषाढी वारी (Ashadhi War) पालखी सोहळ्यानिमित्त वारकऱ्यांच्या आरोग्य संरक्षणासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र, काटेवाडीच्या वतीने विशेष आरोग्य सेवा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाअंतर्गत उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते दिंडी प्रमुखांना औषधोपचार किटचे वाटप करण्यात आले.

अभिनेता-दिग्दर्शक प्रवीण तरडे यांना लोकशाहीर अण्णा भाऊ साठे पुरस्कार जाहीर – सविस्तर बातमी 

यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे, गटविस्तार अधिकारी किशोर माने, तालुका विस्तार अधिकारी सुनील जगताप, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामपंचायतीचे पदाधिकारी उपस्थित होते.

वारकऱ्यांना तातडीची व दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी डॉ. बापू दडस यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य पथक कार्यरत होते. पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या वारकऱ्यांची आरोग्य तपासणी करून आवश्यक औषधोपचार करण्यात आले.

प्राथमिक आरोग्य केंद्र, काटेवाडीच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली देवकाते यांनी दिलेल्या माहितीनुसार, या उपक्रमाअंतर्गत ९०० हून अधिक वारकऱ्यांवर औषधोपचार करण्यात आले, तर प्रकृतीची आवश्यकता लक्षात घेऊन १६ वारकऱ्यांना आंतररुग्ण म्हणून दाखल करून आवश्यक उपचार देण्यात आले.

पालखी सोहळ्यादरम्यान वारकऱ्यांच्या आरोग्याची प्रभावी काळजी घेण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र, काटेवाडीमार्फत राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे वारकरी व नागरिकांनी स्वागत केले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×