Breking News
भारतीय संस्कृती, कलेचा प्रसार जगभर व्हावा- दिग्पाल लांजेकरदिड दिवसाचे गणपती बाप्पांचे विसर्जन; वानवडीत घरामध्ये आगीची घटनागणेश मंडळाच्या माध्यमातून शासकीय योजनांच्या जनजागृतीसाठी लोकसंवाद अभियानराष्ट्रीय लोकअदालतीत पुणे जिल्ह्यात ३७,६८७ प्रकरणांचा सामोपचाराने निपटारापिंपरी-चिंचवडमध्ये १६ ते २९ सप्टेंबरदरम्यान मनाई आदेशभीमाशंकर मंदिर व परिसराच्या आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी करा-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडीपशुधन विमा योजनेसाठी अर्ज मागविण्यास सुरुवात तंत्रज्ञानाला श्रद्धेची जोड; नोबल कास्टमध्ये ॲल्युमिनियमपासून साकारला गणरायाअतिक्रमण विभागातील कर्मचाऱ्यांना धक्काबुक्कीपेन्शन कार्डच्या आमिषाने ज्येष्ठाची २४ लाखांची फसवणूक

महाविद्यालयीन तरुणावर वार करुन खुनाचा प्रयत्न

शेतजमिनीतील रस्त्याच्या वादातून भावंडांवर हल्ला

किरकोळ वादातून टोळक्याचा हल्ला; तरुणाच्या डोक्यात दगड घातला, तिघांविरुद्ध गुन्हा

marathinews24.com

पुणे – महाविद्यालयीन तरुणावर शस्त्राने वार करुन खुनाचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना कोढवा भागात घडली. टोळक्याने तरुणाबरोबर असलेल्या मित्रांना मारहाण केली. मोहम्मद उस्मान कामील खान (वय १९, रा. मीठानगर, कोंढवा) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी टोळक्याविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत खान याने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

घरफोडीत १७ लाखांचा ऐवज चोरी – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खान आणि आरोपी हे ओळखीचे आहेत. आरोपी कोंढव्यातील मीठानगर भागात राहायला आहेत. किरकोळ कारणावरुन त्यांच्यात वाद झाला होता. १२ ऑगस्टला रात्री साडेआठच्या सुमारास खान आणि त्याच्याबरोबर असलेले दोन मित्र कोंढव्यातील पारगेनगर चौकातून निघाले होते. त्या वेळी आरोपींनी खान आणि त्याच्याबरोबर असलेल्या मित्रांना अडवले. आरोपींनी खान याच्यावर शस्त्राने वार केले. त्याच्याबरोबर असलेल्या मित्रांना मारहाण केली. खान याच्या डोक्यात दगड घालून आरोपी पसार झाले. खुनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी तिघा आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पसार झालेल्या आरोपींचा शोध घेण्यात येत आहे. पोलीस उपनिरीक्षक सागर पवार तपास करत आहेत.

दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू

भरधाव दुचाकी वाहनावर आदळून दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना कर्वे रस्ता परिसरात नुकतीच घडली. सागर सुरेश साळुंखे (वय ३९, रा. कामना वसाहत, कर्वेनगर ) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वार तरुणाचे नाव आहे. याबाबत पोलीस शिपाई धीरज पवार यांनी अलंकार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार सागर साळुंखे हे ५ ऑगस्ट रोजी दुपारी चारच्या सुमारास कर्वे रस्त्यावरील स्वातंत्र्य चौकातून होते. अभिषेक हाॅटेलजवळून गुळवणी महाराज पथाकडे भरधाव निघालेले दुचाकीस्वार साळुंखे यांचे निंयंत्रण सुटले आणि दुचाकीने वाहनाला पाठीमागून धडक दिली. अपघातात साळुंखे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना त्वरीत खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाला. पोलीस उपनिरीक्षक शिवशंकर जाधव तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×