Breking News
राज्यसभा खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांची संसदीय स्थायी समितीच्या अध्यक्षपदी नियुक्तीनॉर्वे दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शिष्टमंडळात ‘ग्रीनएक्स’च्या आरती भोसले-अहिवळे यांची निवडआरएमसी दरवाढीवर तोडगा काढण्यासाठी बीएआय-आरएमसी यांच्यात संयुक्त बैठकपुणे विभागाची मान्सूनपूर्व तयारी आढावा बैठक संपन्नमुंढव्यातील तो खून नव्‍हे अपघातबनावट सोने तारण ठेवून बँकेची ४ कोटींची फसवणूककाेथरूड भागात तरुणावर शस्त्राने वारमतदार यादी विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमाबाबत राजकीय पक्षांची बैठक संपन्न‘एपीके’ फाईल पाठवून ५० हजारांची फसवणूकनीट २०२६ पेपरफुटी प्रकरणी पुण्यात संताप; छावा संघटनेचे आंदोलन

पर्वती परिसरात चिमुरडीवर अत्याचाराचा प्रयत्न, नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला

स्वारगेट पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीला ताब्यात

marathinews24.com

पुणे –  शहरातील पर्वती परिसरात एका नऊ वर्षीय चिमुरडीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी दि. रात्री उशिरा उघडकीस आली. मात्र, परिसरातील जागरूक नागरिकांनी हस्तक्षेप केल्यामुळे मोठा अनर्थ टळला. मुलीवर अत्याचार टळला असून, नागरिकांनी आरोपीला बेदम मारहाण केली. तोपर्यंत स्वारगेट पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीला ताब्यात घेतले. दरम्यान, घटनेची माहिती पसरल्याने नागरिकांनी पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपीला ताब्यात देण्याची मागणी केली. मात्र, स्वारगेट पोलीस अंमलदारानी लोकांना अडवून आरोपीचा बचाव केल्यामुळे मॉब लिचिंग सारखी घटना टळली आहे.

नवले पूल परिसरात आंदोलनाला बंदी – सविस्तर बातमी

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी हा चिमुरडीच्या नात्यातील असून, तो मुलीसोबत संशयास्पद हालचाली करत असताना काही नागरिकांच्या लक्षात आले. त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत आरोपीला पकडले. संतप्त नागरिकांनी आरोपीला बेदम मारहाण करत त्याला स्वारगेट पोलिसांच्या ताब्यात दिले. घटनेनंतर स्वारगेट पोलीस ठाण्याबाहेर नागरिकांनी मोठी गर्दी केली असून, आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे. परिसरात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, नुकत्याच नसरापूर गावातील चिमुरडीवरील अत्याचार आणि हत्या प्रकरणामुळे नागरिकांमध्ये प्रचंड संताप आहे. त्याच पार्श्वभूमीवर ही घटना घडल्याने लोकांची प्रतिक्रिया अधिक तीव्र झाल्याचे पाहायला मिळाली.

पोलीसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे. नागरिकांच्या सतर्कतेमुळे संभाव्य गंभीर गुन्हा टळल्याने त्यांच्या भूमिकेचे सर्वत्र कौतुक होत आहे. पर्वती परिसरात या घटनेचे लोण वेगाने पसरले. त्यामुळे नागरिक मोठ्या संख्येने पोलीस ठाण्यात दाखल झाले होते. रात्री उशिरापर्यंत स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×