Breking News
‘सेवा संकल्प अभियान’च्या माध्यमातून आदिवासी बांधवांपर्यंत योजनांचा थेट लाभ पोहोचविण्याचा संकल्पPune Crime News : अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची १९ लाखांची फसवणूकखरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीतून दागिने चोरीPune Cash Seizure : गणेशोत्सवात एकाकडे ४२ लाखांची रोकड सापडलीPune PG Hostel Action : पुण्यात अनधिकृत पीजी, हॉस्टेल व्यावसायिकांचे धाबे दणाणलेआयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटन

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त बारामती एमआयडीमध्ये १ हजार वृक्ष लागवडीचे नियोजन-प्रादेशिक अधिकारी हनुमंत पाटील

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त बारामती एमआयडीमध्ये १ हजार वृक्ष लागवडीचे नियोजन-प्रादेशिक अधिकारी हनुमंत पाटील

‘स्वच्छ, सुंदर आणि हरित बारामती’ संकल्पेला पूरक उपक्रम

marathinews24.com

बारामती – दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जंयतीचे औचित्य साधून उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती कॅटलफिडस् प्रा. लि.च्यावतीने महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या परिसरात १ हजार वृक्ष लागवडीचे नियोजन आले आहे. वृक्ष लागवड कार्यक्रमाचा प्रारंभ 22 जुलै पासून करण्यात येणार आहे, अशी माहिती बारामती एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी हनुमंत पाटील यांनी दिली आहे.

दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील पोलिस कारवाईच्या निषेधार्थ 23 जुलै रोजी महाराष्ट्र बंद; ॲड. प्रकाश आंबेडकर यांची घोषणा – सविस्तर बातमी 

एम.आय.डी.सी. परिसरातील बिरोबा मंदिर परिसरात १५०, एम. आय. डी. सी. फेज २ वॉटर टँक परिसरात १७५, ग्रामपंचायत वंजारवाडी येथे १०० तसेच एम. आय. डी. सी. फेज २ ग्रामपंचायत कटफळ येथे ५७५ झाडांचे वृक्षारोपण करण्यात येणार आहे.

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा ‘स्वच्छ, सुंदर आणि हरित बारामती’ दूरदृष्टीचा व एक महत्त्वाचा संकल्प होता. पर्यावरण संवर्धन व हरित क्षेत्र वाढीसाठी हा उपक्रम राबविण्यात येत असून स्थानिक प्रशासन व संबंधित यंत्रणांच्या समन्वयातून वृक्षारोपणाची प्रभावी अंमलबजावणी केली जात आहे.

कुरकुंभ एमआयडीसी परिसरात दोन हजार वृक्षांची लागवड

आज एमआयडीसी कार्यालय बारामती आणि रोटरी कल्ब, दौंड यांच्या संयुक्त विद्यमाने दौंड तालुक्यातील कुरकुंभ एमआयडीसी परिसरात दोन हजार वृक्षांची लागवड करण्यात आली, आगामी काळातही एमआयडीसी आणि सेवाभावी संस्था यांच्यासमवेत अधिकप्रमाणात वृक्ष लागवड करण्यात येणार आहे, अशी माहिती श्री.पाटील यांनी दिली आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×