Breking News
MLC Election 2026 : विधान परिषदेच्या ५ पदवीधर व शिक्षक मतदारसंघांसाठी २३ ऑक्टोबरला मतदानBaramati Wastewater Reuse : बारामतीत सांडपाण्यावर प्रक्रिया केलेल्या पाण्याचा पुनर्वापरPune News : पुण्यात २२ ऑक्टोबरला ‘सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज’चे जनजागृती सत्रPune Assault Cases : महिला पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण; कोरेगाव पार्कमधील घटनाPune Post Office : टपाल विभागाच्यावतीने २७ ऑक्टोबरला पेन्शन अदालतीचे आयोजनYerawada Drainage Pit Death Case : येरवड्यात खड्ड्यात पडून ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यूPune Fodder Production Plan : पुणे जिल्ह्यात २५ हजार एकरांवर चारा उत्पादनाचे नियोजनPune Police : पुण्यातील १० गुन्हेगारांना तडीपारीचा दणकाPune Water Scarcity Action Plan : संभाव्य पाणीटंचाई निवारणासाठी त्रैमासिक कृती आराखडा तातडीने सादर करा – अमित पाथरवटPune Cyber Crime : पेन्शनकार्ड नोंदणीची बतावणी, जेष्ठाला ५ लाखांचा गंडा

श्री संत तुकाराम महाराज व श्री संत सोपानकाका महाराज पालखी स्वागतासाठी बारामती सज्ज

श्री संत तुकाराम महाराज व श्री संत सोपानकाका महाराज पालखी स्वागतासाठी बारामती सज्ज

पालखी सोहळा सुरक्षितपणे पार पाडण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे-मुख्याधिकारी पंकज भुसे

marathinews24.com

बारामती – श्री संत तुकाराम महाराज पालखीचे आणि श्री संत सोपानकाका महाराज पालखीचे बारामती नगर परिषद हद्दीत आगमन होणार असून पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी नगर परिषद प्रशासन सज्ज झाले आहे, अशी माहिती मुख्याधिकारी पंकज भुसे यांनी दिली आहे.

वैष्णवांच्या मेळ्यासमवेत शासकीय योजनांची माहिती देणारी ‘संवादवारी’ – सविस्तर बातमी 

बारामती शहरात पालखीचा मुक्काम शारदा प्रांगण या ठिकाणी असून येणाऱ्या वारकऱ्यांसाठी विविध सुविधा उपलब्ध करून देण्याकरीता नगर परिषद युद्धपातळीवर काम करत आहे. संपूर्ण पालखी मार्गावरील रस्त्यांचे खड्डे भरणे, वारकरी पुतळा सुशोभिकरण करणे, रस्त्यांची स्वच्छता, धूर फवारणी, सार्वजनिक शौचालय दुरूस्ती व स्वच्छता आदी कामे करण्यात आली आहेत. शहरातील सर्व पथदिवे सुस्थितीत सुरु राहतील तसेच स्वच्छ व शुद्ध पाणी पुरवठा सुरळीत ठेवण्याबाबत दक्षता घेण्यात आली आहे. शहरातील हातपंप दुरूस्त करून विंधन विहिरींचे निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे.

पालखी मुक्कामाचे ठिकाण असलेले शारदा प्रांगण येथे मंडप, स्टेज, विद्युत, शौचालय, स्नानगृह व निवारा आदी आवश्यक सर्व व्यवस्था करण्यात आली आहे. नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांसह ४५० अधिकारी व कर्मचारी असा संपूर्ण अधिकारी- कर्मचारी वर्ग वारकऱ्यांच्या व्यवस्थेसाठी काम करीत आहे. प्रत्येक कामासाठी स्वतंत्र समन्वय अधिकाऱ्याची नियुक्ती केली आहे. स्वच्छता व जनजागृतीविषयक कामासाठी तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय बारामती आणि विद्या प्रतिष्ठानचे महाविद्यालय येथील एकूण १ हजार २०० स्वयंसेवक म्हणून काम करणार आहेत.

शहरात २६ ठिकाणी शौचालयाची सुविधा

बारामती नगर परिषद व बारामतीमधील ‘बारामती सजग नागरिक मंच’ यांनी संयुक्तपणे शौचालय व्यवस्थापनाचे नियोजन केले आहे. शहरात मार्केट यार्ड- इंदापूर रोड(२), मोतीबाग चौक, घोलप ऑटो, हॉटेल सुदित, देसाई इस्टेट, तुपे बंगला, कुलकर्णी बंगला, रेल्वे स्टेशन, पतंजली स्टोअर-भिगवण रोड, शिवकृपा सोसायटी, गोरे चाळ, श्रॉफ पेट्रोल पंप, नेवसे रोड, दाते गणेश मंदिर, सांस्कृतिक केंद्र, वणवे मळा, नाना नानी पार्क, पांढरीचा महादेव, कृषी उत्पन्न बाजार समिती (जळोची) अशा एकूण २६ विविध ठिकाणी शौचालय उभारण्यात येणार आहेत.

वारकऱ्यांकरिता ५ ठिकाणी टँकर भरण्याची सुविधा

सर्व दिंड्यांना टँकरने पाणी भरण्याकरीता जलशुद्धीकरण केंद्र(२), कॅनाल पुलावर पाटस रिंग रोड, अवचट इस्टेट, कचरा डेपो रस्ता, हॉटेल चैतन्य ५ ठिकाणी सोय उपलब्ध करुन देण्यात आली आहे. शारदा प्रांगण येथे वारकरी स्त्री पुरुष यांना वेगवेगळी स्नानगृहाची व्यवस्था करण्यात आलेली आहे.नगर परिषदेमार्फत शारदा प्रांगण येथे आपत्कालीन नियंत्रण कक्ष २४ X ७ कार्यरत ठेवण्यात आला आहे. हेल्पलाईन क्र.१८००२३३२३०२ कार्यान्वित आहे.

‘हरित वारी-सुरक्षित वारी’ उपक्रमाचे आयोजन

‘हरित वारी-सुरक्षित वारी’ उपक्रमा करिता नगर परिषद कार्यरत असून पालखी कालावधीत विविध ठिकाणी वारकऱ्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच पालखी मार्गावर कचरा पडू नये यासाठी पेट्या ठेवण्यात येणार आहेत. तसेच कॅनालवर अग्नीशमन विभागामार्फत पहारा ठेवण्यात येणार असून कॅनाल मार्ग बंद करण्यात आलेले आहेत. प्लास्टिक मुक्त, तंबाखुमुक्त शहर ठेवण्यासाठी व पालखी सोहळा सुरक्षितपणे पार पाडण्यासाठी शहरातील नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन मुख्याधिकारी  भुसे यांनी केले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×